Flight service starting from 31st Augus from Pune to Konkan Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील कोकणवासियांसाठी गुड न्यूज! गणेशोत्सवासाठी थेट विमानाने जाता येणार; केव्हापासुन सेवा सुरू? वाचा सविस्तर...,

Rohini Gudaghe

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

यंदा गणेशोत्सवात पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण आगामी गणेशोत्सवात कोकणकरांना जाण्यासाठी विमानसेवा सुरू होत आहे. आपण याबाबत सविस्तर जाणून घेवू या. पुण्यातून कोकणात जाण्यासाठी दि. ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होत असल्याचं समोर आलंय.

कोकणवासियांसाठी गुड न्यूज

ही विमानसेवा पुणे-गोवा आणि पुणे-सिंधुदुर्ग या दोन मार्गांवर सुरू होत (Pune News) आहे. त्यामुळे यंदा लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी पुण्यातील कोकणवासियांना विमानाने जाता येणार आहे. फ्लाय ९१ विमान कंपनीकडून या दोन्ही मार्गांवर शनिवार आणि रविवारी ही विमानसेवा सुरू असणार आहे. त्यामुळे आता अवघ्या तासाभरात पुण्यातून कोकणात (Kokan ganeshotsav) पोहचता येणार असल्यामुळे कोकणकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

गणेशोत्सवासाठी थेट विमानाने जाता येणार

पुण्यातील कोकणवासियांसाठी गुड न्यूज आहे. गणेशोत्सवासाठी थेट विमानानं जाता येणार आहे. पुणे-सिंधूदुर्ग-पुणे या विमान सेवेमध्ये फ्लाइट क्रमांक आयसी ५३०२ विमान पुणे विमानतळावरून सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी सुटणार (Flight from Pune to Konkan news) आहे. ते नऊ वाजून दहा मिनिटांनी सिंधूदुर्ग विमानतळावर पोहोचणार असल्याची माहिती मिळतेय. तर, फ्लाइट क्रमांक आयसी ५३०३ सिंधूदुर्ग ते पुणे हे विमान सिंधूदुर्गधून सकाळी साडेनऊ वाजता सुटणार आहे. ही फ्लाईट पुण्यामध्ये सकाळी दहा वाजून ३५ मिनिटांनी दाखल होणार असल्याचं समोर आलंय.

केव्हापासुन सेवा सुरू?

पुणे-गोवा-पुणे मार्गावर फ्लाइट क्रमांक आयसी १३७६ सकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी गोव्यामधील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटणार आहे. ही फ्लाईट पुण्यामध्ये सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार (Flight service from Pune to Konkan) आहे. तर, फ्लाइट क्रमांक आयसी १३७५ सकाळी दहा वाजून ५५ मिनिटांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटणार आहे. ते गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी पोहोचणार असल्याची माहिती मिळतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT