कारचा टायरच काळ बनला! 5 जणांचा जागीच मृत्यू, पुणे सोलापूर महामार्गावर थरारक अपघात
Indapur Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Indapur Accident News: कारचा टायरच काळ बनला! 5 जणांचा जागीच मृत्यू, पुणे सोलापूर महामार्गावर थरारक अपघात

मंगेश कचरे

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण कार अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथे कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. तर एक जण गंभीर जखमी, तर एक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 2 येथे राष्ट्रीय महामार्गावरती हा अपघात झालाय. या अपघातात गाडीचा पुढच्या बाजूचा पूर्णतः चुराडा झाला आहे. रफिक कुरेशी, (वय - ३४), इरफान पटेल (वय -२४), मेहबूब कुरेशी (वय - २४) आणि फिरोज कुरेशी (वय - २८), अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर सय्यद इस्माईल कुरेशी, असं जोखमीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेली (टी एस ०७ जी एल २५७४) ही गाडी डाळज हद्दीत आल्यानंतर गाडीचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटला. यानंतर साधारण ५० मीटर गाडी जमिनीला घासत येऊन डाव्या साईडला चार ते पाच पलट्या खात ड्रेनेज लाईनच्या सिमेंट खांबाला जोरात धडकली आणि नाल्यात जाऊन पडलीय.

गाडीत सहा पुरुष होते त्यापैकी ५ जण जागीच ठार झाले होते, तर एकजण गंबीर जखमी झालाय. तर यात सय्यद इस्माईल, सय्यद अमीर याला किरकोळ मार लागला आहे. सर्व तेलंगणा राज्यातील नारायणखेड येथील आहेत. अपघाताची माहिती समजताच डाळज महामार्गाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आणि ठार झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: Manoj Jarange Patil यांची जनजागृती शांतता यात्रा परभणीत दाखल

Danka Hari Namacha Trailer : आषाढीच्या पार्श्वभूमीवर ‘डंका हरी नामाचा’ वाजणार... धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Marathi Live News Updates : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली संविधान समता दिंडीला भेट

Lucky Girls: 'पापा की परी' या राशीच्या मुली आयुष्यात येताच नशीब पालटतं

Dhule News : शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला मारहाण; आमदारांचे वाहन असल्याने टोल देण्यास विरोध

SCROLL FOR NEXT