Five Crore Cash Siezed From Car in Pune Five Crore Cash Siezed From Car in Pune
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Election : पुण्यात कारमध्ये 5 खोके कॅश पडकली, शिंदेंच्या बड्या नेत्यावर आरोप, संजय राऊतांचा हल्लाबोल

Pune crime News : राज्यात आचारसंहिता असताना पुण्यात पाच कोटी कॅश घेऊन जाणारी गाडी पोलिसांनी पकडली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता असताना पुण्यात पाच कोटी कॅश घेऊन जाणारी गाडी पोलिसांनी पकडली. ही गाडी मोठ्या नेत्याचा असल्याचा आरोप केला जातोय. पुणे-बंगळुरु महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी रात्री एका कारमधून पाच कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. पोलिसांच्या या कारवाईनंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत एकनाथ शिंदेंच्या आमदारांवर आरोप केलाय. (Five Crore Cash Siezed From Car )

पाच कोटी जप्त केले, पण त्याला सोडले -

पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटी रूपयांची रोख रक्कम पकडली. पोलीसांनी रक्कम जप्त केली पण ज्यांच्याकडे रक्कम होती त्यांच्याकडे चौकशी करुन त्यांना सोडून दिले. जप्त केल्यानंतर पोलीस चौकीत ही रक्कम नेहण्यात आली आणि निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि इन्कम टॅक्सच्या अधिकार्यांना पोलीस चौकीत कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं . मात्र त्यानंतर कारवाईची माहिती गुप्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला.

संजय राऊतांचा गंभीर आरोप...

गाडी कुणाच्या नावावर?

कारमध्ये पाच कोटी रुपयांची रक्कम कुठून आली होती, कुठे निघाली होती आणि हे पाच कोटी रूपये कोणाचे आहेत याची माहिती देण्यास न पोलीस , न प्रांताधिकारी ना निवडणूक विभागाचे अधिकारी , ना इन्कम टॅक्सचे अधिकारी तयार झाले. दरम्यान ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली ती गाडी MH45 AS2526 या क्रमांकाची असून ती सांगोल्यातील अमोल नलावडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. या कारवाईबाबत पोलीस निरिक्षक राजेश गवळी, प्रांत अधिकारी यशवंत माने आणि निवडणूक अधिकारी यांनी मात्र एकानेही उत्तर दिलेले नाही.

आतापर्यंत राज्यात ३१ कोटींचा मुद्देमाल जप्त

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरातून आचारसंहिता भंगाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून आयोगाच्या सी-व्हिजिल ॲपवर आतापर्यंत ७७६ तक्रारी प्राप्त झाल्या असून ३१ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली.राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर नागरिकांनी केलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

पुण्यात दररोज रात्री नाकाबंदी, पोलिसांचा बंदोबस्त तैणात-

पुण्यात आता दररोज रात्री नाकाबंदी केली जाणार आहे. नाकाबंदी दरम्यान मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणे निश्चित केली आहेत. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री ११ ते पहाटे तीनपर्यंत वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. १२५ पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत.

विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील ३ हजार ७६१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT