fisherman Death On Boat Saam Tv News
मुंबई/पुणे

Virar News: मासेमारीसाठी खोल समुद्रात गेला, तिथेच घडली भयानक घटना; खलाशाच्या मृत्यूने हळहळ

fisherman Death On Boat: खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमाराचा बोटीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय.

Priya More

चेतन इंगळे, विरार

Virar Latest News: खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या खलाशाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (heart attack) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अर्नाळा समुद्रकिनाऱ्याजवळ (Arnala Beach) ही घटना घडली. मृत खलाशी विरारच्या अर्नाळा येथे राहणारे होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार अर्नाळा येथील निसर्ग बोट गुरुवारी सायंकाळी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. या बोटीवर एकूण 17 खलाशी होते. बोटीवरील खलाशी विजय जगन्नाथ तारे (45 वर्षे) यांच्या छातीत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दुखू लागले. तारे यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे बोटीवरील इतर खलाश्यांनी इमर्जन्सीसाठी कोस्टगार्डला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण खराब हवामानामुळे संपर्क झाला नाही.

निसर्ग बोटीवरील १७ खलाश्यांनी आधी कोस्टगार्डला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी खोल समुद्रात असलेल्या इतर बोटिंशी देखील व्हीएचएफद्वारे संपर्क कारण्याचा प्रयत्न केला. पण खराब हवामानमुळे त्यांच्याशी सुद्धा संपर्क झाला नाही. शेवटी पहाटे पाचच्या सुमारास या बोटीवरील खलाश्यांचा संदेश अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या बोटीला मिळाला.

त्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या बोटीने खोल समुद्रात जाऊन निसर्ग बोटीवरील खलाशी विजय तारे यांना अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आणले. त्यानंतर त्यांनी तारे यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी विजय तारे यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे विजय तारे यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घरातला कर्ता व्यक्तीचे निधन झाल्यामुळे तारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card KYC: घरबसल्या करा रेशन कार्ड केवायसी; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे नेते दाखल

देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 'या' कंपनीची स्थापना, IAS अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी

Buldhana Accident : केळीने भरलेला ट्रक पलटी; दोन मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर

'The Bads Of Bollywood' मधील प्रसिद्ध अभिनेत्याला एकामागोमाग एक चित्रपटांची लॉटरी, जान्हवी कपूरसोबत झळकणार?

SCROLL FOR NEXT