Firing On Gangster Sharad Mohol Saam Digital
मुंबई/पुणे

Firing On Gangster Sharad Mohol: कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यातील घटनेने खळबळ

Firing On Gangster Sharad Mohol: कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळीबार झाल्याची माहिती आहे. त्याला तीन गोळ्या लागल्या असून गंभीर जखमी झाला आहे.

Sandeep Gawade

Firing On Gangster Sharad Mohol

कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळीबार झाल्याची माहिती आहे. त्याला तीन गोळ्या लागल्या असून गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून भर दुपारी घडलेल्या या घटनेने पुण्यात एकच खळबळ माजली आहे. शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याच्यावर हल्ला पूर्ववैमन्यस्यातून झाला की आणखी कोणत्या कारणातून याची अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी शरद मोहोळ यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण आहे शरद मोहोळ

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पिंटू मारणे हत्येप्रकणात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दासवे गावच्या सरपंचाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

SCROLL FOR NEXT