pune BJP MLA Sunil Kamble slaps police constable video viral
pune BJP MLA Sunil Kamble slaps police constable video viral Saam TV

Mla Sunil Kamble: पुण्यात भाजप आमदाराची दादागिरी, थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली; VIDEO व्हायरल

BJP Mla Sunil Kamble Video: भाजप आमदार सुनील कांबळे यांनी थेट ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Published on

BJP Mla Sunil Kamble Latest News

मंचावरून उतरत असताना धक्का लागल्याच्या कारणावरुन भाजप आमदार सुनील कांबळे यांनी थेट ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात हा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

pune BJP MLA Sunil Kamble slaps police constable video viral
Crime News: खळबळजनक! कबूतर सोडून दिल्याने मोठ्या भावाला राग अनावर; ७ वर्षीय भावाची हत्या, मृतदेह विहिरीत फेकला

पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble नेहमी आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असतात. ससून रुग्णालयातील उद्घाटन पाटीवर नाव न टाकल्याच्या रागातून शुक्रवारी सकाळी आमदार कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय सेलच्या अध्यक्षाच्या कानशिलात लगावली होती.

हा प्रकार घडल्यानंतर काही वेळातच कांबळे यांनी कार्यक्रमाच्या मंचावरून खाली उतरत असताना थेट पोलिस कर्मचाऱ्याच्या (Police) कानशिलात लगावली. विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच हा प्रकार घडला. आमदार कांबळे यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर चौहेबाजूंनी टीकेची झोड उठली आहे.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ ट्वीट करत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "काल अब्दुल सत्तार, आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज..."

"भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी?गृहमंत्री याची दखल घेणार का?" असा सवाल वडेट्टीवर यांनी उपस्थित केला आहे.

"पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो", अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दरम्यान, मी कुठल्या ही प्रकारची मारहाण किंवा कोणाला ही कानाखाली मारलेली नाही, असे स्पष्टीकरण भाजप आमदार सुनील कांबळे यांनी दिले आहे. तुम्ही दाखवत असलेला व्हिडीओ कुठला आहे हे मला माहिती नाही आणि मी कुठल्या ही कर्मचारी किंवा पदाधिकारी यांना मारलेले नाही असं उत्तर सुनील कांबळे यांनी दिले आहे.

भाजप आमदार सुनील कांबळे यांनी आज पुण्यातील ससून रुग्णालयात झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

pune BJP MLA Sunil Kamble slaps police constable video viral
NCP Disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा तिढा लवकरच सुटणार; सुनावणीचे वेळापत्रक जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com