उल्हासनगरात हजारो विद्यार्थ्यांची अग्निसुरक्षा धोक्यात! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगरात हजारो विद्यार्थ्यांची अग्निसुरक्षा धोक्यात!

शहरातील २२२ पैकी फक्त १३ शैक्षणिक संस्थांकडे फायर एनओसी!

अजय दुधाणे

उल्हासनगर - शहरात असलेल्या २२२ शाळांपैकी फक्त १३ शैक्षणिक संस्थांकडेच फायर एनओसी नसल्याची धक्कादायक बाब मनविसेने माहितीच्या अधिकारात उघड केली आहे. त्यामुळे शहरातील हजारो विद्यार्थ्यांवर आगीचे संकट घोंघावत असल्याचे समोर आले आहे. उल्हासनगर शहराची विभागणी ५ कॅम्पसमध्ये झालेली असून शहरातील या ५ कॅम्पमध्ये मिळून एकूण २२२ शाळा-महाविद्यालय यांचा समावेश आहे.

यापैकी फक्त १३ शाळा आणि महाविद्यालयांनी अग्निशमन विभागाकडून फायर एनओसी मिळवली आहे. तर उर्वरित २०९ शैक्षणिक संस्थांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी माहितीच्या अधिकारात याबाबतची माहिती मागवली होती. त्याला अग्निशमन विभागाने दिलेल्या उत्तरात ही चिंताजनक बाब उघड झाली आहे.

हे देखील पहा -

याहून धक्कादायक बाब म्हणजे या २०९ शाळा-महाविद्यालयांपैकी काही शाळा आणि महाविद्यालयं ही एखाद्या इमारतीच्या गच्चीवर किंवा बेसमेंटमध्ये आहेत. या शाळा महाविद्यालयांच्या इमारतीत इतर व्यावसायिक आस्थापना आहेत. शिवाय शाळा आणि महाविद्यालयात येण्या-जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे.

त्यामुळे अशा ठिकाणी फायर एक्झिट नसल्याने आग लागली, तर हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या शाळा, तसंच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येत्या १५ दिवसात फायर एनओसी मिळवावी, अन्यथा सुरक्षित जागेत स्थलांतर करावं, अशी मागणी मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी केली आहे.

याकडे शैक्षणिक संस्थाचालकांनी दुर्लक्ष केल्यास हायकोर्टात या शैक्षणिक संस्था आणि महापालिका अधिकारी यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचा इशारा मनोज शेलार यांनी दिला आहे. दरवेळी एखादी आगीची मोठी घटना घडल्यानंतर अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येतो. मात्र कालांतरानं त्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र आता उल्हासनगर शहरातील शैक्षणिक संस्थाचालक ही बाब गांभीर्याने घेतात का? हे पाहावं लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

SCROLL FOR NEXT