Central Railway  Saam tv
मुंबई/पुणे

Central Railway : मुंब्रा स्टेशनच्या ट्रॅकजवळ भीषण आग, प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, VIDEO व्हायरल

mumbra fire : मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर भीषण आग लागली. मुंब्रा रेल्वे रुळानजीक गवताने पेट घेतला.

विकास काटे, ठाणे

मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे ट्रॅकजवळ भीषण आग लागली आहे. रेल्वे ट्रॅकजवळील गवताने पेट घेतल्याने आग लागली. आग लागल्याने लोकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळील ही घटना आहे. रेल्वेच्या ट्रॅकजवळ सांयकाळच्या सुमारास ही आग लागल्याचे बोललं जात आहे. रेल्वे ट्रॅकवरील गवताने पेट धरल्याने फास्ट अप आणि डाऊन लाईनवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या आगीमुळे रेल्वेसेवेवर परिणाम झाल्याची कोणतीही माहिती हाती आलेली नाही. गवताला नेमकी कशी आग लागली, याचीही माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मुंब्रा स्टेशनच्या ट्रॅकजवळील कचऱ्याला आग लागली. या आगीची माहिती मिळतात अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीच्या घटनास्थळी कोणालाही दुखापत झालेली नाही. अनिल भगत बंगल्यासमोर असलेल्या दत्तवाडीजवळील कचऱ्याला आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटात आग विझविली. या आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली. कचऱ्याला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून बुधवारी रात्री ८ :३७ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT