Pune Fire update Saam tv
मुंबई/पुणे

Pune Fire : पुण्यात इमारतीला भीषण आग; चौघींनी घाबरून बाल्कनीतून मारल्या उड्या

Pune Fire update : पुण्यात इमारतीला भीषण आग लागली. या आगीत दोघे जण जखमी झाले. आग लागल्यानंतर रहिवाशांध्ये खळबळ उडाली.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील कोथरूडमधील वनाज परिसरातील एका इमारतीत भीषण आग लागल्याची घटना घडली . या आगीमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग लागल्यानंतर इमारतीत राहणाऱ्या चौघींनी घाबरून बाल्कनीतून उड्या मारल्या. आगीच्या या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील वनाज परिवार सोसायटीच्या मीटर रूममध्ये आग लागली. या आगीची झळ डक्टपर्यंत पोहोचली. त्यानंतर वायरिंग जळून ७, ८ आणि ९व्या मजल्यावरील पॅसेजमध्ये मोठ्या प्रमाणात धूर आणि उष्णता पसरली. त्यामुळे पॅसेजमधील वायरिंग आणि डोअर बेल वितळले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि प्रत्येक मजल्यावरील फ्लॅटमध्ये कोणी अडकले आहे का, याची पाहणी केली. काही रहिवासी बाल्कनीत अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधील चौघींनी आगीला घाबरून दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत उड्या मारल्या. या घटनेत एका मुलीच्या पायाला दुखापत झाली आहे. तसेच एक वयोवृद्ध व्यक्ती जिन्यामधून खाली उतरताना पडून जखमी झाले. या आगीत सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला आहे. मात्र, या घटनेत एकूण दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

चर्चगेट रेल्वे स्थानकात लागली आग

मुंबईमधील चर्चगेट रेल्वे स्थानकावर सांयकाळी भीषण आग लागल्याची घडली. रेल्वे स्थानकातील केकच्या दुकानाला आग लागली. या भीषण आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. आग लागताच प्रवाशांनी पळ काढला. स्टेशनला आग लागल्याची मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT