pune bus fire
pune bus fire  saam tv
मुंबई/पुणे

Pune Bus Fire : पुण्यात PMPML बसच्या केबिनमध्ये लागली आग, चालकानं प्रसंगावधान राखलं म्हणून....

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

Pune Bus Fire News : पुण्यातील नवले पुलावरील वाहनाच्या अपघातानंतर आता शहरात बसला आग लागल्याची घटना घडली आहे. पुण्यातील अप्पर डेपो बसस्थानकाजवळ बसला आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

पुण्यातील (Pune) अप्पर डेपो डेपो बसस्थानक येथे बसला आग लागल्याची घटना घडली. या बसला आग लागल्याची खबर माहिती होताच गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना झाले. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी बसच्या पुढील बाजूस इंजिनच्या ठिकाणी पेट घेतल्याचे निदर्शनास येताच आगीवर पाण्याचा मारा सुरू केली. जवानांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील अप्पर डेपो डेपो बसस्थानक येथे बसच्या केबीनला अचानाक आग लागली. डेपो ते स्वारगेट मार्गाच्या या बसचे बसचालक विश्वास किलजे यांनी प्राथमिक स्तरावर प्रसंगावधान राखला. त्यांनी बसस्थानकावर उपलब्ध असलेले दोन अग्निरोधक उपकरण वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवानांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.

घटनेवेळी बसमध्ये कोणीही प्रवासी नव्हते. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या कामगिरीत गंगाधाम अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी सुनिल नाईकनवरे, वाहनचालक निलेश कदम व जवान जितेंद्र कुंभार, आदिनाथ मोहिते यांनी सहभाग घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Today's Marathi News Live: आदित्य ठाकरेंचा 30 एप्रिलला श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT