Mumbai Fire News  Nivrutti Babar
मुंबई/पुणे

Mumbai Fire News : मुंबईत आगीचं सत्र सुरूच; सिद्धिविनायक मेट्रोस्टेशन परिसरात भीषण आग

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल झाल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : सध्याच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रभादेवी येथील नव्याने होणाऱ्या सिद्धिविनायक मेट्रोस्टेशन परिसरात आग लागली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीये. (Latest Mumbai News)

मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीमुळे धूराचे लोट हवेत दुरवर पसरलेले दिसत आहेत.

मुंबईत आगीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिलत आहे. सातत्याने परिसरात आग लागल्याच्या घटना घडत आहेत. काल मालाड पूर्वच्या जामरुशीनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. या आगीत ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. तर एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे.

दुसरीकडे मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात असलेल्या एका हॉटेलला रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाचे जवान आणि वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे काही वेळत शक्य झाले. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, तिघे जण जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! पुण्यातील जोडप्याकडून तीन वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण; ५ दिवसांनी चिमुकला सापडला पंजाबमधील वृद्धश्रमात

Maharashtra Live News Update: ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ रंगाचा अर्थ काय?

Banana Benefits: महिनाभर केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

SBI बँकेत सिनेस्टाईल दरोडा; 58 किलो सोनं आणि 8 कोटी कॅश लुटलं|VIDEO

SCROLL FOR NEXT