Mumbai Zaveri Bazaar Fire
Mumbai Zaveri Bazaar Fire ANI
मुंबई/पुणे

Zaveri Bazaar Fire News: झवेरी बाजारमधील इमारतीला लागलेली भीषण आग नियंत्रणात; नागरिकांच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Zaveri Bazaar Fire News : मुंबईतील झवेरी बाजारमधील पाच मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली होती. इमारतीला लागेलली आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाकडून आता कुलिंगच काम सुरु आहे. आगीच्या दरम्यान एका किरकोळ जखमीला उपचार घेऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईतील झवेरी बाजारमधील पाच मजली इमारतीला रात्री 1.38 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. संपूर्ण इमारतीत आग पसरल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र अग्रिशनमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबईतील झवेरी बाजार येथील चायना बाजार इमारतीला ही भीषण आग लागली होती. सहा मजल्या पैकी तळ मजला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा मजल्याला आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले.

अग्निशमन दलाच्या 12 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. इमारतीत अडकलेल्या 50 ते 60 लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अग्निशन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग आणि जिन्यांचा काही भाग कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande Trolled : ‘स्वत:ला माधुरी दीक्षित नको समजू...’, धकधक गर्लच्या लूकमध्ये आली अंकिता लोखंडे, नेटकऱ्यांनी सुनावलं

Astro Tips: घरात सुखशांती नांदवण्यासाठी हळदीचा करा 'या' पद्धतीनं वापर

Sambhajinagar Corporation : प्रारूप विकास आराखड्यावर ८ हजार ५०० आक्षेप; सुनावणीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती

Kolhapur Constituency : 'लोकांमध्ये मिसळणे आमच्यासाठी नवीन नाही', मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शाहू महाराज छत्रपतींच्या नातीने स्पष्टच सांगितलं, Video

Career Tips: करिअरमध्ये यश हवंय? या टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT