Vasai Virar Fire
Vasai Virar Fire Saam Tv
मुंबई/पुणे

विरार मध्ये फर्निचरच्या दुकानाला आग; 8 ते 10 दुकानं जळून खाक

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई /विरार - विरार पूर्व येथील मनवेल पाडा परिसरात संत नगर येथील सात ते आठ दुकानांना अचानक आग (Fire) लागली. ही घटना शुक्रवारी मध्य रात्री 12 च्या सुमारास घडली. दुकानांमध्ये लागडी फर्निचर आणि कापसाच्या गाद्या असल्याने काही क्षणात आगीने लोन सर्वत्र पसरले आणि सर्व दुकानें जळून खाक झाली.

सदराची दुकाने ही रस्त्याच्या कडेला रहिवाशी इमारती पासून काही अंतरावर असल्याने मोठी दुर्घटना टळली. वसई विरार महानगर पालिका अग्निशन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवार नियंत्रण मिळवले आहे. एकूण 30 जवान आणि 4 पाण्याचे बंब घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाले होते.

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार सदराची दुकाने बेकायदेशीर असून या ठिकाणी अग्नीसुरक्षा रोधक कोणत्याही यंत्रणा नव्हत्या. यामुळे आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रथमदर्शी सदराची आग ही शॉक सर्किटने लागली असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. सरदारच्या दुकानात कुणी मंजूर अथवा कारागीर राहत नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण लाखो रुपयाची वित्तहानी झाल्याचे समाजात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT