Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल  Saam Tv
मुंबई/पुणे

Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर काल पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर काल पुणे (Pune) महानगरपालिकेत (Municipal Corporation) हल्ला करण्यात आला आहे. शिवसेनेचे (Shivsena) पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्याची काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्याकरिता गेले होते. परंतु त्या ठिकाणी झटपट झाल्यावर शिवसैनिकांनी (Shiv Sainik) सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात या प्रकरणी ७ ते ८ शिवसैनिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७ यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Filed case against eight Shiv Sainik connection attack Kirit Somaiya)

हे देखील पहा-

भाजप (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शनिवारी पुण्यामध्ये शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले आहेत. यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत. संचेती रुग्णालयात जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सत्ताधीर शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. किरीट सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही लोकशाही आहे की गुंडाराज, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे.

किरीट सोमय्या यांना मारण्याचा डाव होता. एकजण त्यांच्यामागे दगड घेऊन धावत होता. हा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न होता. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते हल्ला करत आहेत. ही लोकशाही आहे की गुंडाराज आहे. पुणे महापालिकेची सुरक्षा यंत्रणा काय करत होती? पुणे पोलीस काय करत होते? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सत्य कधीच लपणार नाही. अनिल देशमुखांनी सांगितले की अनिल परब बदल्यांची यादी घेऊन यायचे. उद्धव ठाकरे यांचे नाव त्यामध्ये आले आहे, असे देखील पाटील म्हणाले आहेत.

पुणे पोलिसांकडून स्वतःहून स्यु मोटो पद्धतीने या प्रकरणामध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर आम्ही न्यायालयात जाणार आहे. कारण ही दंगल होती. या सरकारला आम्ही न्यायालयामध्ये गेल्यावर प्रत्येकवेळेस न्यायालयाने लाथाडले आहे. भाजप गप्प बसणार नाही. किरीट सोमय्यांची केंद्र सरकारकडून देण्यात आलेली सी.आय.एस.एफची सुरक्षा व्यवस्था नसती तर त्यांना श्रद्धांजली व्हावी लागली असती, असे देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar : पाय घसरल्याने नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; नदीकाठी जनावरे चारताना दुर्दैवी घटना

Sharadiya Navratri 2025 : नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग आत्ताच जाणून घ्या

GK: कोणत्या देशात Gen Z ची सर्वाधिक लोकसंख्या आहे? जाणून घ्या आकडेवारी

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

ZP President Reservation: जिल्हा परिषदेवर 'महिलाराज'! कोणता जिल्हा कोणत्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव? यादी वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT