Gas Cylinder  yandex
मुंबई/पुणे

Pune Crime News: गॅस सिलेंडरचा लाखो रुपयांचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड

Gas Cylinder: जेजुरी पोलीस आणि पुरंदर तालुका पुरवठा विभागाने संयुक्तरित्या छापा टाकून कारवाई करत गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त केला आहे. कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या टोळक्याच्या पर्दाफाश झाला.

Dhanshri Shintre

घरगुती गॅस सिलेंडरमधून मशिनच्या साहाय्याने गॅस काढून अवैधपणे व्यापारी सिलिंडर भरणाऱ्या चार जणांच्या जेजुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळक्याच्या पर्दाफाश झाला आहे. घरगुती गॅसच्या सिलेंडरमधून व्यापारी गॅसच्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचा प्रकार सुरु असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे कर्नलवाडी गुळूंचे हद्दीत सत्यवान जगन्नाथ निगडे यांच्या बंद पडक्या प्लोट्री शेडमध्ये काही व्यक्ती विना परवाना घरगुती गॅसच्या सिलेंडरमधून कमर्शिअल (व्यापारी) गॅसच्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचा प्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती. त्या माहितीच्या आधारे जेजुरी पोलीस आणि पुरंदर तालुका पुरवठा विभागाने संयुक्तरित्या छापा टाकून कारवाई करत गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त केला.

यामध्ये १,८६,००० रू किमतीच्या एचपी कंपनीच्या एकूण भरलेल्या ६२ टाक्या, ३६,८०० रुपये किमतीच्या एचपी कंपनीच्या भरलेल्या ८ कमर्शियल गॅस टाक्या, ८१००० रुपये किमतीच्या एचपी कंपनीच्या मोकळ्या ५४ टाक्या, ७५००० रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅसच्या मोकळ्या टाक्या , १,३६,८०० रुपये किमतीच्या एचपी कंपनीच्या कमर्शियल ५७ मोकळ्या टाक्या, १,०८,००० रुपये किमतीच्या भारत गॅसच्या ३६ मोकळ्या टाक्या , ३०००० रुपये किमतीच्या एस टी पी गॅस भरण्याचे २ मशीन , १०००० रुपये किमतीचे तनिष्क कंपनीचे २ वजन काटे, १००० रुपये किमतीचे १००० गॅस सील टोपण, ६,००,००० रुपये किमतीची गाडी क्र.एम एच ४२ बी एफ ५,७६१ सुझुकी कंपनीची चार चाकी पिकअप असा एकूण १२,६४,६०० रुपये किमतीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अभिजीत दत्तात्रय बरकडे (२२, मोराळवाडी बारामती), विश्वजीत बारीकराव यमगर (२२, पिराळे ता. माळशिरस), तुकाराम चंद्रकांत खताळ ( ३०, कापसी , ता. फलटण), सत्यवान जगन्नाथ निगडे (५०, कर्नलवाडी, पुरंदर) यांनी पांडुरंग राजेंद्र गोफणे (मोराळवाडी बारामती) यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे सांगितले. यातील चार जणांना ताब्यात घेत यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३,७ आणि बी एन एस २८७, २८८,३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सदरील कामगिरी पुरंदरचे पुरवठा निरीक्षक अश्विनी वायसे, अधिकारी महादेव वावरे, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी , उपनिरीक्षक झेंडे, पोलीस हवालदार दशरथ बनसोडे , पोलीस हवालदार आण्णासाहेब देशमुख, विठ्ठल कदम, संदीप भापकर व दोन शासकीय पंच या पथकाने केली असून सपोनि दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक सर्जेराव पुजारी हे पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT