Mumbai Student Fight Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Student Fight: कांदिवलीत महाविद्यालयीन तरुणावर जीवघेणा हल्ला; समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime in Mumbai: याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shivani Tichkule

संजय गडदे

Mumbai Crime News: महाविद्यालयातून घरी जाणाऱ्या युवकाला शिवीगाळ करून चाकूने वार करण्यात आल्याची घटना मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात घडली आहे. चाकूने हल्ला करण्यात आलेला विद्यार्थी इयत्ता अकरावीमध्ये शिकत आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष आणि विशाल अशी हल्लेखोर तरुणांची नावे आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी विद्यार्थी डान्सचा सराव करत असताना पीडित तरुण हा डान्स पाहत असताना त्याच महाविद्यालयातील आयुष या विद्यार्थ्याने त्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की करून हाकलून दिले.

यानंतर पीडित तरुण आणि त्याचा भाऊ एचडीएफसी बँकेसमोर असलेला बस स्टॉप वर उभे असताना आयुष आणि त्याच्या साथीदारांनी पुन्हा शिवीगाळ आणि मारहाण करून त्यातील एका तरुणाने चाकूने वार केला. त्याच वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी (Police) तेथे पोहोचून पीडित तरुणाला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले.

याप्रकरणी पीडित तरुणाने समता नगर पोलीस ठाण्यात आयुष आणि विशाल विरोधात तक्रार दिली असून या तक्रारीनुसार समता नगर पोलिसांनी कलम 323, 324 आणि 504 नुसार गुन्हा दाखल करून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

SCROLL FOR NEXT