Pune Fire: पुण्यातील अग्नितांडव; फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Fire: पुण्यातील अग्नितांडव; फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

पुण्यात आग लागल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या पिसोळी भागात ही भीषण आग लागली

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : पुण्यात Pune आग लागल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या पिसोळी भागात ही भीषण आग लागली आहे. फर्निचर Furniture च्या गोडाऊनला ही आग लागली आहे. या आगीमध्ये गोडाऊन संपूर्ण जळून खाक झाले आहे.

हे देखील पहा-

पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास दगडे वस्तीतल्या एक लाकडी सामानाच्या फर्निचर गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पुणे आणि PMRDA १४ अग्निशमन दलांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर ३ तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे.

सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जवळपास २४ हजार स्वेक्वअर फूट असलेले गोडाऊन या आगीत जाळून खाक झाले आहे. गोडाऊनमधील फर्निचर आणि त्याकरिता लागणारे साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये सूर्य कोपला, पारा 46 अंशावर

"जय महाराष्ट्र, मराठी माणूस थांबता कामा नये..."; Bigg Boss फेम अभिनेत्याची मोठी घोषणा

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; झटपट हे काम कराच अन्यथा पगार मिळणार नाही

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा झटका; ७ खासदारांच्या भाजप प्रवेशाला मंजुरी, सत्ताधाऱ्यांची ताकद आणखी वाढणार

Mumbai News: बिर्याणीनंतर कलिंगड खाणं बेतलं जीवावर, एकाच कुटुंबातील ४ जणांचा संशयास्पद मृत्यू

SCROLL FOR NEXT