FDA Action Against Iskcon Juhu; Licences Of 3 Food Units Suspended saam tv
मुंबई/पुणे

FDAची जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर मोठी कारवाई; 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित

FDA Action: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने इस्कॉन जुहू कॅम्पसमधील तीन फूड युनिट्सचे परवाने निलंबित केले आहेत. 3 सप्टेंबर 2026 रोजीच्या तपासणीत अन्न सुरक्षा, स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि अन्न साठवणुकीशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याचे सांगण्यात आले.

Bharat Jadhav

  • FDA ने जुहूतील इस्कॉन कॅम्पसमधील तीन फूड युनिट्सवर मोठी कारवाई केली

  • अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे कथित उल्लंघन आढळल्यानंतर तीन फूड युनिट्सचे परवाने निलंबित करण्यात आले.

  • 3 सप्टेंबर 2026 रोजी हरे कृष्णा लँडमधील संबंधित सुविधांची एफडीएकडून तपासणी करण्यात आली.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे कथित उल्लंघन केल्याबद्दल इस्कॉन जुहू कॅम्पसमधील तीन फूड युनिट्सचे परवाने निलंबित करण्यात आलेत. एफडीएने 3 सप्टेंबर 2026 रोजी जुहू येथील हरे कृष्णा लँडमधील या सुविधांची तपासणी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा, स्वच्छता, कीटक नियंत्रण, अन्न साठवणुकीत गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर परवाने निलंबित करण्यात आलेत.

मुख्य फूड युनिटमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या नियमित गुणवत्ता तपासणीच्या नोंदी आढळल्या नाहीत. कच्च्या मालाची योग्य तपासणी केली जात नव्हती. ते योग्य तापमान व आर्द्रतेमध्ये साठवले जात नव्हते. खाद्य आणि इतर वस्तू अशा पद्धतीने साठवल्या जात होत्या की ज्यामुळे क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका निर्माण होत होता. ठरलेल्या स्वच्छता वेळापत्रकाचे पालन न करण्याव्यतिरिक्त, कीटकही आढळून आले.

स्वयंपाकघरात कीटक नियंत्रणाच्या योग्य पद्धतींचा अभाव

इस्कॉन फूड सर्व्हिसेस रेस्टॉरंटच्या तपासणीत स्वयंपाकघराच्या मागे एक उघडे प्रवेशद्वार होते. जिथे कीटक नियंत्रणाच्या योग्य पद्धतींचा अभाव होता. योग्य प्रकाशव्यवस्थेचा अभाव, अन्न तपासणी आणि स्वच्छतेतील त्रुटी, तुंबलेली गटारे, अन्नाचे अवशेष आणि कीटकांचा प्रादुर्भाव देखील आढळून आला. इस्कॉन गोविंदस रेस्टॉरंटमध्ये, अन्न आणि पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी, कच्च्या मालाची तपासणी आणि स्वच्छता प्रणालींमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या.

कच्चे, शिजवलेले आणि शाकाहारी अन्न योग्यरित्या वेगळे ठेवले जात नव्हते, ज्यामुळे क्रॉस-कंटॅमिनेशनचा म्हणजेच एका पदार्थाचे दुसऱ्या पदार्थात मिसळण्याचा धोका निर्माण झाला होता. अन्न कामगारांकडे आवश्यक वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्रे आणि प्रशिक्षणाच्या नोंदी नव्हत्या. दरम्यान हा सर्व तपासणी अहवाल आणि छायाचित्रांचे समीक्षा केल्यानंतर एफडीएने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी 7 सप्टेंबर रोजी परवाना निलंबित करण्याची कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT