एफडीएने मालाडच्या प्राणदा बिल्डिंगमधील गोदामावर छापा टाकून ३१७ बॉक्स औषधे जप्त केली.
जप्त औषधांमध्ये बिनपरवाना व कालबाह्य औषधांचा समावेश असून किंमत कोट्यवधी रुपयांची आहे.
ही कारवाई PMJAY सदस्य भिमेश मुतुला यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली.
प्रकरण गंभीर असून औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम 1940 आणि BNS 2023 अंतर्गत गुन्हा दाखल होणार.
संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
मालाड पश्चिम येथील प्राणदा बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड च्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पथकाने 31 जुलै रोजी मोठी कारवाई करत तब्बल 317 बॉक्समधील बिनपरवाना आणि मुदतबाह्य औषधसाठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही धडक कारवाई रुग्णसेवक भिमेश मुतुला यांच्या तक्रारीमुळे केली. या छापेमारीत केसांच्या तेलासह विविध आजारांवरील कालबाह्य औषधे आढळून आली असून यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
ही धडक कारवाई रुग्णसेवक भिमेश मुतुला यांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली. भिमेश मुतुला हे आयुष्मान भारत PMJAY व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समितीचे सदस्य आहेत. त्यांनी Pranda Biopharma कंपनीकडून स्वतः केसांचे तेल मागवून त्याची वैधता तपासली असता, उत्पादने कालबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी सर्व पुरावे FDA कमिशनर (आयुक्त) राजेश नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केले, त्यावर त्वरित कारवाई करत इंटेलिजन्स ब्रँच (IB) च्या सहकार्याने ही छापेमारी करण्यात आली.
सदर प्रकरण हे औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे मानले जातात. या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या औषधांचा साठा व विक्री सुरू होती, असा प्राथमिक अंदाज आहे. भविष्यात अशा प्रकारे जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करून कंपनीला कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी ठाम मागणी रुग्णसेवक भिमेश मुतुला यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.