Yerwada police station
Yerwada police station Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात किळसवाणी घटना! पॉर्न फिल्म दाखवून बापानं केला मुलीचा विनयभंग

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

येरवडा: पुण्यातील कल्यानी नगर परिसरामध्ये एक अत्यंत किळसवाणी घटना घडली आहे. वडिलांनी स्वतःच्या मुलीला वारंवार पॉर्न फिल्म दाखवून तिचं वारंवार विनयभंग केला आहे. या प्रकरणी एका 23 वर्षाच्या मुलीने स्वतःच्याच वडील, आई आणि बहिणी विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आई, वडील आणि बहिणी सोबत कल्यानी नगर भागातील एका सोसायटीत राहते. वर्ष 2010 ते 2021 दरम्यान ही घटना वारंवार तिच्यासोबत घडल्याचं पीडित मुलीने आपल्या तक्रारीत लिहिले आहे. पीडित मुलीची इच्छा नसताना देखील मुलीचे वडील घरातील कंप्युटरवर आणि स्वतःच्या मोबाईलवर तीला पॉर्न फिल्म दाखवायचे. तर पीडित मुलीची आई आणि बहिण तीला अश्लील शिवीगाळ करायचे; अस पीडित मुलीने दिलेल्या तक्रारारीत लिहल आहे. (Yerwada Crime News)

हे देखील पाहा-

तर, पीडित तरुणी ही उच्चशिक्षित असून ती सध्या एका खासगी कंपनीत कामाला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून येरवडा पोलिसांनी पीडित मुलीचे वडील, तिची आई आणि बहिणी विरोधात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने दाखल केलेली तक्रार कितपत खरी आहे आणि तिच्याकडे तिच्या वडील, आई आणि बहिणी विरोधात काय पुरावे आहेत याचा तपास सध्या येरवडा पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: शुक्र ग्रहाचे मेष राशीत संक्रमण, मेष ते मीन राशींवर काय होणार परिणाम? वाचा राशिभविष्य...

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

SCROLL FOR NEXT