हृदयद्रावक : ६ वर्षाच्या चिमुरड्यासह बस चालक पित्याची रेल्वखाली उडी घेत आत्महत्या प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

हृदयद्रावक : ६ वर्षाच्या चिमुरड्यासह बस चालक पित्याची रेल्वखाली उडी घेत आत्महत्या

धावत्या रेल्वेसमोर प्रमोद यांनी मुलासह उडी घेतली. रेल्वेखाली उडी मारताना मुलगा ट्रकमधून बाहेर पडल्याने थोडक्यात बचावला.

प्रदीप भणगे

कल्याण : मुंबईकडून पुण्याला जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेससमोर आपल्या मुलासह रेल्वेसमोर उडी मारून एका पित्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनमध्ये घडली आहे. या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे मात्र सहा वर्षाचा चिमुरडा या सुखरूप बचावला आहे आत्महत्या केलेले मृत पित्याचं नावं प्रमोद आंधळे असून ते बेस्ट मध्ये चालक म्हणून नोकरीवर कार्यरत होते,

प्रमोद आंधळे हे मुलगा स्वराजसह सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी स्टेशनमध्ये (Railway Station) पोहचले विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस या धावत्या रेल्वेसमोर (Railway) त्यांनी मुलासह उडी मारली. प्रमोद यांनी रेल्वेखाली उडी मारली त्यावेळी त्यांचा मुलगा ट्रकमधून बाहेर पडला मात्र प्रमोद रेल्वेखाली गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी स्वराजला बाहेर काढले, तर प्रमोद यांचा मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. उल्हासनगरमधील शांतीनगर परिसरात प्रमोद हे पत्नी मुलगा आणि मुलीसह राहत होते. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

बटण पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

Local Body Election: आता थेट निवडणूक आयोगाला कोर्टात खेचणार; निलेश राणेंचा मोठा निर्णय

Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

SCROLL FOR NEXT