दुर्दैवी : 50 रुपयांसाठी बापाची मुलाला मारहाण; डोक्याची कवटी फुटल्याने मुलाचा मृत्यू
दुर्दैवी : 50 रुपयांसाठी बापाची मुलाला मारहाण; डोक्याची कवटी फुटल्याने मुलाचा मृत्यू Saam Tv
मुंबई/पुणे

दुर्दैवी : 50 रुपयांसाठी बापाची मुलाला मारहाण; डोक्याची कवटी फुटल्याने मुलाचा मृत्यू

कल्पेश गोरडे

ठाणे : 50 रुपये चोरले म्हणून निर्दयी बापाने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कळवा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी आणि पंचनाम्याला सुरुवात केली असता पोलिसांना मुलाचा मृतदेह एका चादरीमध्ये जखमी अवस्थेत गुंडाळलेला आढळून आला.

करण प्रजापती (Karan Prajapati) असे त्या मयत मुलाचे नाव असून त्याला 50 रुपये चोरले म्हणून पप्पांनी मारहाण केल्याची माहिती करणच्या बहिणीने पोलिसांना दिली. दारूच्या नशेत बापाने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांना तपासात समोर आली आहे. संदीप उर्फ बबलू ओमप्रकाश प्रजापती असे त्या निर्दयी बापाचे नाव असून तो मद्यपी (अट्टल दारुडा) आहे. त्यानंतर पोलिसांनी करणचा शव शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठवत आणि निर्दयी बापाला ताब्यात घेतलं.

हे देखील पहा -

मुलाच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा, त्याचबरोबर मुलाला झालेल्या अमानुषपणे मारहाणीत त्याचे दोन्ही हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला होता तसेच डोक्याची कवटी फुटल्याने करणचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन अहवालातून पोलिसांना मिळाल्यानंतर कळवा पोलीस ठाण्याचे (Kalva Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली निर्दयी बापाला अटक करून त्याच्या विरोधात भादवी 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

Buldhana Crime News: संतापजनक! दुचाकीस्वाराला धडक दिली, जखमीला उपचारासाठी नेतो सांगून दरीत फेकलं; आरोपीला अटक

Diabetes Problem : डायबेटीजने त्रस्त महिलांनी हे फळ रोज खावे; रक्तातील साखर लगेचच कंट्रोलमध्ये येणार

Beed News: मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT