Ulhasnagar
Ulhasnagar  Saam TV
मुंबई/पुणे

Crime News: पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला, उल्हासनगरमधील घटनेने खळबळ

अजय दुधाणे

उल्हासनगर : पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणावर घरात घुसून चॉपर आणि तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. तसेच त्याच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना भाटिया चौक परिसरात घडली आहे. या हल्ल्यात तरुण वेदूरानी हा गंभीर जखमी झाला असून त्यावर सध्या उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आरोपी गौतम फुलवाणी याच्या विरोधात जखमी तरुण वेदुरानी याने पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. याचा राग मनात धरून मध्यरात्री आरोपी गौतम आणि त्याच्या दोन साथीदारांनी तरुण याच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला केला. (Crime News)

हल्लेखोर घरातून बाहेर निघताना सीसीटीव्हीत कैद झाले असून या हल्ल्यात तरुणाच्या कानावर छातीवर तोंडावर गंभीर वार केल्याने मोठी दुखापत झाली आहे. दरम्यान हे गुंड एवढ्यावरच न थांबता घरासमोर उभी असलेली कारची देखील तोडफोड करत नुकसान केलं आहे. आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT