Pune News Mangesh Kachare Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : इंदापूरात सापडली बॉम्ब सदृश्य वस्तू; धक्कादायक घटनेनं गावात भीतीचं वातावरण

जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली.

साम टिव्ही ब्युरो

मंगेश कचरे

Pune News : इंदापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील एका गावात शेतकऱ्याला बॉम्ब सारखी एक वस्तू सापडलीये. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Pune Latest News)

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील टणू गावात एका शेतकऱ्याला आपल्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळली. टणू गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दत्तात्रय मोहिते यांच्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. त्यानंतर या शेतकऱ्यानं पोलिसांच्या 112 ह्या हेल्पलाईनला संपर्क केला. तसेच या संदर्भात माहिती दिली.

माहिती मिळताचं इंदापूर पोलीस आणि बॉम्ब शोध व नाश पथक, BDD पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. या श्वान पथकाने ही वस्तू डिटेक्ट केली असून थोड्याच वेळात या ठिकाणी बॉम्ब शोध व नाश पथकाची टीम दाखल होणार आहे. त्यानंतर ही वस्तू खरंच बॉम्ब आहे का की अन्य काही आहे याबाबत उलगडा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakharam Binder: पुन्हा रंगभूमीवर 'सखाराम बाइंडर'; सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शित

Maharashtra Live News Update: विधानसभेच्या पराभवानंतर पवारांचे खच्चीकरण झालेय - राज्यमंत्री

Tejashree Pradhan- कितीदा नव्याने तुला आठवावे...

Mumbai To Sangli: मुंबईहून सांगलीपर्यंत कोणत्या मार्गाने प्रवास करावा? जाणून घ्या अंतर आणि सोपे मार्ग

फॅटी लिव्हरला बरं करायचंय? मग लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT