फॅटी लिव्हरला बरं करायचंय? मग लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल

Surabhi Jayashree Jagdish

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज

आजकाल यकृताच्या म्हणजेच लिव्हरच्या आजारांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये, झपाट्याने वाढ होत आहे. यापैकी सर्वात सामान्य आजार म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज.

तरूणांमध्ये वाढतंय प्रमाण

पूर्वी ही समस्या प्रामुख्याने वयोवृद्धांमध्ये दिसून येत असे, पण आता चुकीचा आहार, बिघडलेली जीवनशैली आणि लठ्ठपणा यामुळे तरुणांनाही हा त्रास होऊ लागला आहे.

धोका

वेळीच काळजी घेतली नाही, तर फॅटी लिव्हर पुढे जाऊन नॉन-अल्कोहोलिक स्टिओटोहेपॅटायटिस, लिव्हर फायब्रोसिस, सिरॉसिस आणि लिव्हर कॅन्सरचे कारण बनू शकतो.

कशी कराल मात?

चांगली गोष्ट म्हणजे, जीवनशैलीत बदल करून आणि योग्य उपचार घेतल्यास फॅटी लिव्हरवर मात करता येते.

संतुलित आहार घ्या

फॅटी लिव्हरपासून बचाव करण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मेडिटेरेनियन डाएट

मेडिटेरेनियन डाएट यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरते. यासाठी आपल्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, सुकामेवा, ऑलिव्ह तेल आणि मासे यांचा समावेश करावा.

वजन कमी करा

फॅटी लिव्हर सुधारण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे वजन कमी करणे. शरीराचे फक्त ५-१०% वजन जरी कमी केले, तरी लिव्हरमधील चरबी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

व्यायामाला प्राधान्य द्या

एका संशोधनानुसार, दीर्घकाळ बसून राहणं हे फॅटी लिव्हरचं मोठं कारण आहे. यापासून बचावासाठी रोज चालणं किंवा सायकल चालवणं उपयुक्त ठरतं.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा