FAMILY SUICIDE ATTEMPT IN PUNE: HUSBAND DEAD, WIFE AND DAUGHTER UNDER TREATMENT saam tv
मुंबई/पुणे

घरात कोळशाचा धूर केला, नंतर विषारी औषधाचे सेवन, कुटुंबाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, धक्कादायक कारण समोर

family Trying End Life Due To Financial Crisis In Pune Morwadi: पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरात आर्थिक विवंचनेतून कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न. पतीचा मृत्यू तर पत्नी आणि मुलगी उपचाराधीन. सुसाईड नोटमध्ये आर्थिक अडचणींचा उल्लेख.

Omkar Sonawane

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पिंपरी चिंचवड: आर्थिक अडचणींना कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेत कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला असून, पत्नी आणि १९ वर्षांची मुलगी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरातील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये आर्थिक विवंचनेतून एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कुटुंबप्रमुख विनोद पिल्लाई (वय 50) यांचा मृत्यू झाला असून, पत्नी शैलेजा पिल्लाई (वय 45) आणि मुलगी पूर्णिमा पिल्लाई (वय 19) यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिघेही मूळचे केरळ येथील असून, मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटी, ए/5, रूम क्रमांक 201 येथे भाड्याने राहत होते.

प्राथमिक माहितीनुसार, तिघांनी घरात कोळशाचा धूर करून त्यासोबत काही विषारी औषधाचे सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी विनोद पिल्लाई यांना तपासणीनंतर मृत घोषित केले. पत्नी आणि मुलगी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती लक्षात ठेवून वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

घराची झडती घेतली असता पोलिसांना एक सुसाइड नोट मिळाली आहे. त्यामध्ये आर्थिक अडचणींमुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली असून, पुढील तपास संत तुकाराम नगर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: चांदवड टोलनाक्यावर लाखो रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त

Hair Care: केसात खूप कोंडा झालाय? 'हे' ७ सोपे उपाय करतील प्रॉब्लेम दूर, केसही राहतील हेल्दी

Ladki Bahin Yojana : लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली! अंतिम यादी जाहीर; आता लाडकी बहीण योजनेचा ₹1,500 चा हप्ता कधी येणार?

Mumbai Tourism : मुंबईच्या पावसात 'या' ठिकाणी फिरण्याची मजा काही वेगळीच, रविवारी मित्रांसोबत घालवा निवांत संध्याकाळ

चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण

SCROLL FOR NEXT