Sasoon Hospital Dr Ajay Taware Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident: ससून रूग्णालयातील डॉ. अजय तावरेंच्या अडचणी वाढणार? आणखी एका प्रकरणात गंभीर आरोप

Fake Report Allegations On Sasoon Hospital Dr Ajay Taware: पोर्शे अपघात प्रकरणामधील ससून रूग्णालयातील डॉ. अजय तावरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे, त्यांच्यावर आणखी एक चुकीचा अहवाल दिल्याचा आरोप केला जात आहे.

Rohini Gudaghe

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

पोर्शे अपघात प्रकरणात अटकेत असणारे ससून रूग्णालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ अजय तावरेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. डॉक्टर तावरेंनी २०१८ मध्ये देखील असाच एक चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप केला जात आहे. डॉ. तावरेंवर हा आरोप शिरूरच्या मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांनतर आता डॉ. तावरेंच्या अडचणी आणखी वाढणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, रेहाना शेख यांचा ११ ऑगस्ट २०१८ मध्ये प्रसूतीनंतर (Sasoon Hospital) मृत्यू झाला होता. प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला, मात्र संबंधित डॉक्टरने रक्त उपलब्ध करून ठेवलं नव्हतं. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हा मृत्यू झाल्याचा आरोप रेहाना यांचे भाऊ आणि पतीने केला होता. यावेळी या प्रकरणाची (Fake Report Allegations On Dr Ajay Taware) चौकशी करण्यासाठी पावलं उचलली गेली होती.

त्यावेळी डॉक्टर अजय तावरेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली गेली होती. मात्र तावरेंनी २७ नोव्हेंबर २०१८ ला डॉक्टरांच्या बाजूने अहवाल दिला. मग या कुटुंबाने ब्लड बँकेतून २१ जानेवारी २०१९ रोजी रीतसर माहिती घेतली होती. तेव्हा डॉक्टर तावरेंनी पैश्यांसाठी चुकीचा अहवाल दिल्याचं या दोन्ही कुटुंबियांच्या लक्षात आलं (Dr Ajay Taware) होतं.

मुलानी आणि शेख कुटुंबियांना अद्याप न्याय मिळाला नाही. त्यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. पालकमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी या कुटुंबीयांनी केली आहे. परंतु पोर्शे अपघातामध्ये (Pune Porsche Accident) डॉ. तावरेंवर कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे शेख आणि मुलांनी कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT