Gold chain snatching incident captured on CCTV in Mumbai saam tv
मुंबई/पुणे

डिलिव्हरी बॉयचा वेश अन् पत्ता विचारण्याचा बहाणा; वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली

Kandivali Gold Chain Snatching Case Captured On Cctv Camera: मुंबईतील कांदिवली पश्चिममध्ये डिलिव्हरी बॉयचा वेश धारण करून आलेल्या चोरट्याने ७६ वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: कांदिवली पश्चिम परिसरात डिलिव्हरी बॉयचा वेश धारण करून आलेल्या चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ७६ वर्षीय वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मथुरादास रोडवरील उमंग ए विंग सोसायटीमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजून २३ मिनिटांनी ही घटना घडली. अरुणा अनिलकांत रुपाणी (वय ७६) या सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर आपल्या फ्लॅटबाहेर लिफ्टजवळ उभ्या होत्या. त्याचवेळी डिलिव्हरी बॉयचा वेश परिधान केलेला एक तरुण तेथे आला. त्याने एका व्यक्तीचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेशी संवाद साधण्यास सुरुवात केली.

महिलेने त्याला पत्ता सांगितल्यानंतर आपल्या फ्लॅटचे कुलूप उघडण्यासाठी त्या वळल्या. याच संधीचा फायदा घेत आरोपीने अचानक त्यांच्या मागून हल्ला केला आणि गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरल्या. त्यांनी आरडाओरडा करत चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत आरोपी इमारतीबाहेर पसार झाला होता.

दरम्यान, घटनेच्या वेळी सोसायटीचा वॉचमन अन्य रहिवाशाला पार्किंगमध्ये मदत करण्यासाठी गेला होता. त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा कर्मचारी उपस्थित नसल्याचा फायदा चोरट्याने घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: किल्ले रायगडावर पार पडली दिवाळी, हजारो मशालीं पेटवून शिवरायांना मानवंदना

CBSE 10th-12th Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE च्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, वाचा संपूर्ण वेळापत्रक

कल्याण-मुरबाड, अंबरनाथ, बदलापूरकरांना मोठा दिलासा; अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; चार तालुक्यांना दिलासा

Sequin Saree For Women : महिलांसाठी सिक्वेन साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन , यंदा दिवाळीत नक्की ट्राय करा

Pune School: पुण्यातील १० शाळांची मान्यता रद्द, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; विद्यार्थी अन् पालक चिंतेत

SCROLL FOR NEXT