Banners celebrating fake police job expose Pune youth’s lie. 
मुंबई/पुणे

धायरीचा पोस्टर बॉय! लग्न जुळवण्यासाठी जागोजागी पोलिसांचे बॅनर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Fake Police : लग्न जुळत नसल्यानं एका तरुणानं केलेला बनाव त्याच्य़ाच अंगलट आलाय. कुटुंबीयांची फसवणुक करत पोलीस बनल्याचा बनाव करणाऱ्या तरुणाचं पितळं कसं उघड पडलं? त्यानं लग्न जुळवण्यासाठी काय भन्नाट शक्कल लढवली? पाहूयात.

Suprim Maskar

जागोजागी बॅनर लागले. लोकांनी फटाके फोडले आणि पठ्यानं थेट पेढेही वाटले. पोलिस झाल्याचं सेलिब्रेशन एकदम दणक्यात केलं. मात्र सेलिब्रेशनचे हे बॅनर पाहून पोलिसांना संशय आला आणि आनंदात मीठाचा खडा पडला.

पुण्यातील धायरीत राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न गेल्या अनेक वर्षांपासून जमत नव्हतं. कुटुंबीयही चिंतेत होते. अशातच हा तरुण पोलीस भरतीचाही प्रयत्न करत होता. मात्र कमी उंचीमुळे सतत अपयश येतं होतं.आणि लग्नासाठी घरच्यांची तगादा कायम होता. 'मुलगा पोलिस आहे' असे सांगितलं तर चांगले स्थळ येईल आणि आईही आनंदी होईल,म्हणून तरुणानं एक भन्नाट शक्कल लढवली. कुटुंबियांना पुणे पोलीस दलात भरती झाल्याची खोटी बातमी दिली. नातेवाईकांनी आनंदात जागोजागी बॅनर लावले.

मात्र पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या नजरेस हे बॅनर पडले आणि बॅनरमध्ये दिसणाऱ्या तरुणाची उंची कमी असल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी चौकशी केली, आणि सगळा बनाव उघड झाला.

खरतर ज्या वर्दीच्या जीवावर हा तरुण लग्नाची स्वप्न पाहत होता. त्याचं वर्दीतील बनावट फोटोमुळे पोलिसांनी आता तरुणावर कायदेशीर कारवाई केलीय. थोडक्यात काय, तर शॉर्टकट मारून मिळवलेलं यश किंवा खोटा रुबाब कधी ना कधी अंगलट येतोच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT