Uddhav Thackeray/Devendra Fadnavis
Uddhav Thackeray/Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा, तुम्ही GST घेऊन बसलात; मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला फडणवीसांचं उत्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. या संवादादरम्यान केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांनी देखील तो व्हॅट कमी करावा अशी विनंती मोदी यांनी केली. तसंच कर्नाटक, गुजरात सारख्या राज्यांनी इंधनावरील कर कमी केल्याचं उदाहरण देखील त्यांनी दिलं. कर्नाटक, गुजरातने आर्थिक नुकसान सहन केले मात्र आपल्या राज्यातील जनतेच्या हिताचा आणि फायद्याचा निर्णय घेतला असून इतर राज्यांनी देखील तसा निर्णय घ्यावा असही मोदी यावेळी म्हणाले होते.

मात्र मोदींसोबतची बैठक संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ट्विट करत जीएसटीबाबत (GST) तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या ट्विटला विरोधी पक्षनेते (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहंल आहे. महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के असून संपूर्ण देशात महाराष्ट्रातून सर्वात जास्त १५ टक्के जीएसटी गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी एकत्र केल्यास महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. तरीही महाराष्ट्राला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी असल्याचं त्यांनी लिहलं आहे.

मात्र मुख्यमंत्र्यांचं हेच ट्विट (Tweet) रीट्विट करत फडणवीस यांनी टीका केली आहे. फडणवीसांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, दोषारोप आणि जबाबदारी झटकणे, यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का? मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू झाले. अशी टीका फडणवीसांनी केली.

Edited By - Jagdish patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE: राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात थोड्यात वेळात मतदानाला सुरुवात

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

SCROLL FOR NEXT