फडणवीस हे तर पर्शियन  Saam tv news
मुंबई/पुणे

फडणवीस हे तर पर्शियन

मराठीत भाषेतील अनेक शब्द हे दुसऱ्या भाषांमधून आलेत. आता फडणवीस आडनावाचेच उदाहरण घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) नेहमीच आपल्या बेधडक भाषणासाठी ओळखले जातात. आजही त्यांनी आपल्या बेधडक शैलीत इतिहासाचे दाखले देत फडणवीस या नावाचा अर्थ सांगत खिल्ली उडवली. ''मराठीत भाषेतील अनेक शब्द हे दुसऱ्या भाषांमधून आले आहेत. आता फडणवीस आडनावाचेच उदाहरण घ्या, फडणवीस हे काही आडनाव आहे का, फडणवीस हा मुळचा शब्द पर्शियन भाषेतील आहे. ज्याला पर्शियन भाषेत फर्दनवीस असे म्हणतात. फर्द म्हणजे कागद आणि नवीस म्हणजे लिहीणारा, म्हणजेच कागदावर लिहीणारा, असा या आडनावाचा अर्थ होतो.'' (Raj Thackeray mocks Fadnavis' name; Fadnavis means ... )

ज्येष्ठ शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी आज १०० व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त राज ठाकरे यांनी पुण्यात बाबासाहेबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी इतिहासाचे दाखले देत फडणवीस यांच्या नावाची खिल्ली उडवली. तसेच यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत पुन्हा राज्यातील घडामोडींवर आपली भुमिका स्पष्ट केली. राज्यात सध्या भाजपा आणि मनसेच्या युती बाबत चर्चा सुरु आहे.

- भाजपा मनसे युती

राज ठाकरे आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपुर्वी नाशिकमध्ये भेट झाली होती. याभेटीनंतर राजकीय वर्तुळात भाजपा मनसेच्या युतीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. नाशिक दौऱ्यात राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना उद्देशून भाषण केले होते. या भाषणाबाबत बोलताना ते म्हणाले, माझ्या भुमिका स्पष्ट आहेत. मी चंद्रकांत पाटलांना कोणतीही क्लिप पाठवलेली नाही. उगाच कोणत्याही व्हिडीओमधून सूत जुळवू नका.

- बाबसाहेबांच्या वाढदिवसाबद्दल काय म्हणाले राज ठाकरे

''मी बाबसांहेबांची व्याख्याने लहानपणापासून ऐकत आलो आहे. त्यांच्या शिवचरित्रातून बोध घेतला पाहिजे. आमची जेव्हाही भेट होते त्यावेळी ते काहीना काही नवीन गोष्टी सांगत असतात. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेबांचे नातेही खुप जुने आहे. बाबासाहेबांच्या व्याख्यानानां बाळासाहेब मला घेऊन जायचे. असेही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

SCROLL FOR NEXT