Pune
Pune  Saam TV
मुंबई/पुणे

धरण उशाला अन् कोरड घशाला; खडकवासला धरणाच्या जवळच्या गावातच भीषण पाणी टंचाई

गोपाल मोटघरे

पुणे: पुणे शहराला (Pune City) 24 तास पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाला लागून असूनही, पुणे महानगरपालिका (Pune Muncipal Corporation) हद्दीतील शिवणे, उत्तमनगर, कोंढवे - धावडे आणि कोपरे या गावातील नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रस्त आहेत. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती शिवणे, उत्तम नगर, कोंढवे-धावडे आणि कोपरे गावात निर्माण झाली आहे. याचाच निषेध करण्या करिता आज खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार भीमराव तापकीर आणि उत्तम नगर चे माजी सरपंच सुभाष नानेकर यांच्या नेतृत्वात हजारो महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून शिवणे, उत्तम नगर, कोंढवे-धावडे आणि कोपरे गावाला सुरळीत पाणीपुरवठ होत नसल्याने, या गावांवर भीषण पाणीटंचाईची वेळ ओढवली आहे, असा दावा यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आला. खडकवासला धरणा लगतची गावे महानगरपालिका मध्ये समाविष्ट होऊन पाच वर्ष लोटली तरी पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या गावाना सुरळीत पाणीपुरवठा करत नाही त्यामुळे आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

Special Report : कुलरची थंड थंड हवा ठरतेय जिवघेणी! 7 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT