Panvel News
Panvel News Saam TV
मुंबई/पुणे

Panvel News: पनवेल उड्डाण पुलाखाली महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

साम टिव्ही ब्युरो

Panvel News: पनवेल तालुक्यात उड्डाण पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने महीलेची हत्या केल्याची प्रथमिक माहिती मिळाली आहे. महिलेची हत्या करून तिला पुलाखाली फेकून देण्यात आले आहे. महिलेचा मृतदेह पुलाखाली पिलरला अडकेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील (Panvel) धामणी गावात असलेल्या उड्डाण पुलाखाली हा मृतदेह आढळला आहे. सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरु आहे. गावातील तसेच आसपासच्या परिसरातील बेपत्ता व्यक्तींची लिस्ट करून याची चौकशी करण्यात आला आहे. अद्याप मृतदेहाविषयी ठोस माहिती समजुशकलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती या पुलाखालून जात असताना त्याने महिलेचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत पाहिला. त्याने लगेचच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पिलरला मृतदेह अडकला होता. यात महिलेच डोकं पिलरमध्ये अडकलं होतं. तर आजूबाजूला पाणी साठले होते.

मृत देह या पिलरमधून सोडवून पोलिसांनी ताब्यात घेतला असून सदर घटनेची कसून चौकशी सुरु आहे. धामणी गावात ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर महिलेची ओळख पटल्यावर तिच्या मारेकऱ्यापर्यंत लवकर पोहचा येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

Today's Marathi News Live : अकोल्यात बहुचर्चित हत्याकांडात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Married Before 30 Years : तिशीच्या आत लग्न न केल्यास येतील 'या' अडचणी

SCROLL FOR NEXT