Anil Deshmukh Bail Plea Reject Latest News In Marathi SAAM TV
मुंबई/पुणे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सेशन कोर्टाचा मोठा झटका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा डीफॉल्ट जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.

सूरज सावंत

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. देशमुखांनी दाखल केलेला डिफॉल्ट जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरू आहे.

दुसरीकडे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचेही डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळले आहेत. तर, या प्रकरणात विशेष ईडी कोर्टही तिघांच्या जामीन याचिकांवर आदेश देणार आहे. (Anil Deshmukh default Bail Plea Rejects by Court)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानुसार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील रेस्तराँ आणि बारमधून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुली करण्याचे निर्देश दिले होते. देशमुख यांनी या आरोपांचा इन्कार केला होता. हे प्रकरण कोर्टात (Court) गेले होते. त्यानंतर सीबीआयला त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले होते. देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख यांना अटक केल्यानंतर ते अद्याप तुरुंगात आहेत.

सीबीआयने (CBI) देशमुख आणि संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. मनी लाँडरिंग प्रकरणात ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ते मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणाचा तपास ईडीकडून (ED) सुरू आहे. या वर्षी एप्रिलमध्ये सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात देशमुख, पालांडे आणि शिंदे यांना ताब्यात घेतले होते.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

Face Acne : पिंपल्स होतील गायब, चेहऱ्यावर लावा 'हा' फेसमास्क

Maharashtra Politics : निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचा भडका! शिंदे सेना-भाजप आमनेसामने

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT