"सर्वांनी मास्क लावले पाहिजे"- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिळले शिवसैनिकांचे कान प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

"सर्वांनी मास्क लावले पाहिजे"- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिळले शिवसैनिकांचे कान

प्रदीप भणगे

दिवा: शिळ गावातील शिवसेना शाखेच्या उदघाटनच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी एकच केली होती, मात्र अनेक जणांनी मास्क लावले नव्हते. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सर्वांनी मास्क (Mask) लावले पाहिजे सांगत, पालकमंत्री यांनी शिवसैनिकांचे कान पिळले आहेत. कोरोना (Corona) रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी, ओमिक्राॅनचा (Omicron) प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकीकडे नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करा, मास्क परिधान करा असा उपदेश करीत आहेत. ("Everyone should wear a mask" - Guardian Minister Eknath Shinde slams to ShivSainiks)

हे देखील पहा -

अधिवेशनात सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांनी मास्क लावा असे खडसवून सांगितले. मात्र दुसरीकडे शिवसैनिकच या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. शिळ गावातील शिवसेना (shivsena) शाखेच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यात अनेकांनी मास्कही परिधान केलेले नव्हते. हे पाहून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिवसैनिकांचेच चांगलेच कान पिळले.

कोरोना संकट अजूनही गेलेले नाही, पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली. आता ओमिक्राॅनचा धोका वाढत असताना तुम्ही सर्वांनी मास्क लावला पाहिजे, मी भाषणासाठी मास्क काढले आहे, सर्वांनी मास्क लावत चला. असे खडे बोल शिवसैनिकांना पालकमंत्री यांनी सुनावत मुख्यमंत्री यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करा असा सल्ला देखील त्यांनी दिला. त्यामुळे कोरोनाचे नियम फक्त नागरिकांच आहे का सवाल उपस्थित होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT