Everyone should cooperate to keep the situation peaceful; Home Minister's appeal Saam Tv
मुंबई/पुणे

परिस्थिती शांततापूर्ण राहण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं; गृहमंत्र्यांचं आवाहन

Home Minister's appeal To Everyone: पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शुक्रवारपासून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यापासून मातोश्री परिसरासह मुंबईत तणाव निर्माण झाला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील शांततापूर्ण परिस्थिती राहण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन केलंय. तसेच राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा म्हणायची होती तर त्यांनी अमरावतील त्यांच्या घरी किंवा त्यांच्या मुंबईच्या घरी म्हणायची होती. दुसऱ्याच्या घरात असं काहीतरी करणं हे जाणीवपूर्वक अशांतात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केलाय. (Everyone should cooperate to keep the situation peaceful; Home Minister's appeal)

हे देखील पाहा -

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, पोलिस आपल्या पद्धतीने आपलं कर्तव्य बजावतायत. विनाकारण संघर्ष होईल अशा प्रकारचं कृत्य कुठल्याही बाजूने होऊ नये. पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. जाणून-बुजून असं काहीतरी घडवून या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आहे असं दाखवण्याचा राणा दाम्पत्याचा प्रयत्न आहे, कुणाच्यातरी सांगण्यावरून हे करण्यात आलं आहे असा आरोप वळसे पाटील यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सगळीकडे कायदा आणि सुव्यवस्था, शांतता आहे. राणा दाम्पत्याने नोटीसीचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल असंही ते म्हणाले. तसेच राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा म्हणायची होती तर त्यांनी अमरावतील त्यांच्या घरी किंवा त्यांच्या मुंबईच्या घरी म्हणायची होती. दुसऱ्याच्या घरात असं काहीतरी करणं हे जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT