इथे येणारा प्रत्येक पर्यटक हा महाराष्ट्राचा ब्रँड अम्बॅसिडर झाला पाहिजे - CM ठाकरे Saam Tv News
मुंबई/पुणे

इथे येणारा प्रत्येक पर्यटक हा महाराष्ट्राचा ब्रँड अम्बॅसिडर झाला पाहिजे - CM ठाकरे

पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत, दुसऱ्याची गरज पडायला नको,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विभागाला राज्य सरकार सहकार्य करेल असं आश्वासन दिलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, “महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पर्यटन विभागाने प्रयत्न करावेत. पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत, दुसऱ्याची गरज पडायला नको,” असं म्हणत त्यांनी पर्यटन विभागाला राज्य सरकार आणि अर्थखाते पुर्ण सहकार्य करेल असं आश्वासन दिलं.

हे देखील पहा -

आगामी काळात पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच “पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा लवकर सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक त्या रेल्वे किंवा विमानात घेऊ. पण थोरात साहेब आपल्यावर जबाबदारी असेल की या प्रवासाच्या काळात आपल्याला बैठक संपवावी लागेल. कारण आता जग वेगवान आहे. आपण तिथं पोहचून परती प्रवास सुरू झाला तरी आपली कॅबिनेट संपली नाही तर पंचायत होईल. आपण हे आव्हान घेतलं पाहिजे. डेक्कन ओडीसीमध्ये कॅबिनेट नक्की करणार आहोत.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

पर्यटन विभागाकडे पूर्वी दुर्दैवाने कुणी लक्ष दिले नव्हते पण आता पुढील काळात आपण महत्व देणार आहोत.

लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका पर्यटन व्यवसायास बसला पण अशा परिस्थितीत देखील तुम्ही नवीन योजना, उपक्रम आणले, रोजगार दिला हे कौतुकास्पद आहे.

देशातील १२०० लेण्यांपैकी महाराष्ट्रात ८०० लेणी आहेत असे मी आत्ताच प्रसिध्द इतिहास संशोधक दाऊद दळवी यांच्या पुस्तकात वाचले. आपल्याला खरोखरच किती लेणी ठाऊक आहेत? आपल्या पूर्वजांनी अप्रतिम लेणी खोदली, शिल्पे निर्माण केली. आपण म्हणतो की आपण खूप विकास केला पण त्या काळातल्या सारखे दगडातून रेखीव शिल्प आज आपण निर्माण करू शकतो का? आजच्या युगातली लेणी निर्माण करायला हवी.

कास पठारासारखी अनेक पठारे आपण शोधून आपण ती ठिकाणे लोकप्रिय करू शकतो

जुनं ते सोनं आहे आणि आपण ते जपतोय पण नवीन सुद्धा निर्माण करण्याची हिम्मत आमच्यात आहे. सुविधा निर्माण करू शकतो पण त्या टिकवणे आणि त्यांना दर्जेदार ठेवणे देखील महत्वाचे आहे.

कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे. येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजे, इतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावे.

राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल. महाराष्ट्राचे वैभव जपा आणि वाढवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उप-मुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यटन विभागातले अनेक अधिकारी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT