लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही खासदार डॉ. अमोल कोल्हे कोरोना पाॅझिटिव्ह Saam Tv News
मुंबई/पुणे

लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही खासदार डॉ. अमोल कोल्हे कोरोना पाॅझिटिव्ह

शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी ते दिल्लीमध्ये बैठक घेणार होते. पण आता ते स्वतः कोविड पॉझिटिव्ह आल्याने ही बैठक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (Even after taking two doses of the vaccine, MP Dr. Amol Kolhe Corona Positive)

हे देखील पहा -

त्याचप्रमाणे ते म्हणाले की, कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे.

कोरोनाची लागण झाल्याने खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मतदास संघातील सर्व पुर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही त्यामुळे नागरिकांनी गर्दी करणे टाळावे आणि कोरोना नियमांचे कठोर पालन करावे असं आव्हान त्यांनी जनतेला केलं आहे. सोबतच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असंही ते म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

SCROLL FOR NEXT