कलम ३७० हटवून सुद्धा परिस्थितीत सुधारणा होऊ शकली नाही - संजय राऊतांची टीका... Saam Tv News
मुंबई/पुणे

कलम ३७० हटवून सुद्धा परिस्थितीत सुधारणा होऊ शकली नाही - संजय राऊतांची टीका...

काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा वाढला आहे. कलम ३७० हटवून सुद्धा परिस्थितीत सुधारणा होऊ शकली नाही अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी कलम ३७० सह अनेक मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात परिस्थिती हाताबाहेरच जात नाही, तर दहशतवाद पुन्हा वाढला आहे. कलम ३७० हटवून सुद्धा परिस्थितीत सुधारणा होऊ शकली नाही अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे. (Even after deleting section 370, the situation could not be improved - Sanjay Raut's criticism)

हे देखील पहा -

तसेच त्या ठिकाणी शीख, काश्मिरी पंडित, बिहारी यांची हत्या करण्यात आली आहे, ही जबाबदारी केंद्र सरकारची गृहमंत्रालयाची आहे. पाकिस्तानच्या बाबतीत धमक्यांची भाषा बोलून हे थांबणार नाही. सर्जिकल स्ट्राईक करून हे थांबणार नाही असंही ते म्हणाले आहेत. चीनने सुद्धा घुसखोरी केली आहे त्यांच्यावरही सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे असा खोचक सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच राजकीय सोयीनुसार भूमिका सरकार घेत आहे, काश्मीरची जनता मरत आहे असा आरोप करत सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पाकीस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबत ते म्हणाले की, पाकीस्तानशी कुठलेच संबंध ठेऊ नका, आम्ही सातत्याने सांगत आहे. तुम्ही (मोदी) तिकडे जाऊन केक कापता, गळा भेट घेता असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. काश्मीर परिस्थितीबाबत ते म्हणाले की, परिस्तिथी आटोक्यात नव्हती आली. तिकडे मीडिया, सोशल मिडियावर बंद होती, नेते कैद होते त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत. याबाबत सरकारने स्पष्ट केलं पाहिजे. ईडी, एनसीबी,सीबीआय या संस्थांबाबत राऊत म्हणाले की, ईडी,सीबीआय, एनसीबीचा उपयोग त्या ठिकाणी (जम्मू-काश्मीरमध्ये) करा किरीट सोमय्या यांना आम्ही तिकडचे कागदपत्र पुरावतो तिकडे जा असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.

महाविकास आघाडीतील मंत्र्यांवरील आरोपांबाबत राऊत म्हणाले की, केंद्र सरकार विरोधात राज्यातील मंत्र्यानी नुसतं खुर्चीत बसून न राहता आरोपांना उत्तरं द्यावी. हे फक्त आम्ही आणि इतर एक दोन नेतेच करत आहोत असं ते म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! दोन परदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू|VIDEO

'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला ही शुभ वस्तू नक्की खरेदी करा, दारिद्र्य होईल दूर

SCROLL FOR NEXT