BRS Party Will Merge with Sharad Pawar Group Saam Tv
मुंबई/पुणे

BRS Party : महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, अख्खा बीआरएस पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी अख्खा बीआरएस पक्ष शरद पवार गटात विलीन होनार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Satish Kengar

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष आता शरद पवार गटात विलीन होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी येत्या 6 तारखेला पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करतील, असं सूत्रांचं म्हणणं आहे. राज्यातील बीआरएस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. यानंतर ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यावेळी के चंद्रशेखर राव यांनी स्वतः नागपूरमध्ये येऊन स्वतःच्या पक्षाच्या कार्यलयाचे उद्घाटन केले होते.

त्यावेळी चंद्रशेखर राव म्हणाले होते की, ''बीआरएस पक्षाचा उद्देश देशात उच्च दर्जाच्या बदलाची गरज आहे. आम्ही आमची सुरुवात महाराष्ट्रापासून केलीय. यानंतर आम्ही मध्यप्रदेश, राजस्थान असं करत पुढे जाणार आहोत.''

मात्र आता महाराष्ट्रात त्यांच्या पक्ष गाशा गुंडाळण्याचा तयारीत असल्याचं दिसत आहे. यातच तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल होते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवत सत्ता स्थापन केली. यानंतरच बीआरएसची तेलंगणात पीछेहाट होत असताना आता महाराष्ट्रातही पक्ष हद्दपार होण्याच्या दिशेने पुढे वाढत असल्याचं चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT