कल्याणमधील BSUP इमारतीची लिफ्ट गायब! पालिका मात्र अनभिज्ञ... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कल्याणमधील BSUP इमारतीची लिफ्ट गायब! पालिका मात्र अनभिज्ञ...

प्रदीप भणगे

कल्याण: केंद्र सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बीएसयुपी (Basic Services to the Urban Poor - BSUP) योजनेतील इमारतीमधील घराची लाभार्थ्यांना प्रतीक्षा असताना या रिकाम्या इमारतीमधील लिफ्टच चोरी झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील कचोरे (Kalyan East - Kachore) परिसरात घडली आहे. मात्र याबाबत पालिका प्रशासन अनभिज्ञ आहे. यापूर्वी या इमारतीमधील खिडक्यांची तावदाने, ग्रील, दरवाजे, मीटरबॉक्स, विजेच्या वायर्स आणि अगदी लाद्या देखील चोरांनी पळवल्या असून आता इमारतीची लिफ्ट देखील काढून नेल्याने या इमारतीची वाताहत झाली आहे. (Elevator of BSUP building in Kalyan stolen! The municipality does not even know)

हे देखील पहा -

दरम्यान याबाबत पालिका प्रशासनाने याप्रकरणाची माहिती घेत गुन्हा दाखल केला जाणार असून या इमारतीची सुरक्षा करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याचा किवा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले, मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॅमऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने (KDMC) गरिबांना इमारतीत घरे देण्यासाठी केंद्र सरकारच्या बीएसयुपी (BSUP) योजनेतून 2007 साली या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. कचोरे, उंबर्डे, बारावे परिसरात या योजनेतून 7272 घरे प्रस्तावित असली तरी यातील 2500 घरांचेच काम पूर्ण झाले आहे, तर  1600 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले असून हजारो घरे लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

आधी दरवाजे मग खिडक्या,नळ, वायरी आता बीएसयूपीच्या इमारतीची लिफ्ट चोरली...पालिका मात्र अनभिज्ञ

बीएसयूपी अंतर्गत कचोरे येथे 1082 घरे तयार असून यातील 200 घरांचा ताबा देण्यात आला आहे, तर 882 घरे रिकामी आहेत. यातील 545 घरे रेल्वेला विकण्यात आली असून आतापर्यंत यातील 56 घरांचा ताबा घेतला गेला आहे. मात्र याखेरीज आणखी काही इमारती रिकाम्या असून कचोरे येथील बंद असलेल्या या घरांच्या खिडक्या, ग्रील्स, दरवाजे, मीटरबॉक्स, विजेच्या वायर्स आणि लाद्या केव्हाच चोरीला गेल्या असून आता एका इमारतीची लिफ्टच चोरीला गेली आहे. तर दुसरी लिफ्ट निम्म्याहून अधिक गायब असून उर्वरित लिफ्टचे सामान थोडेथोडे काढून नेले जात असल्याचे दिसत आहे. मात्र याबाबत पालिका प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

३ महिन्यांपूर्वी या इमारतीमधील खिडक्यांची ग्रील आणि दरवाजे चोरून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत पालिका आयुक्तांनी पोलिसांना पत्र देत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र तरीही इमारतीमधील वस्तूची चोरी थांबण्याची चिन्हे नसून आता तर चोरांनी लिफ्ट चोरून पालिका प्रशासनाला खुले आव्हान दिले आहे. दरम्यान याप्रकरणी बाधित लाभार्थ्यांनी येत्या 15 दिवसांत आपल्याला आपल्या हक्काच्या घराचा ताबा न मिळाल्यास जबरदस्तीने ताबा घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT