Maval Electricity News
Maval Electricity News दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

लाईट आली! स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मावळमधील धनगर वस्तीत पोहोचली वीज

दिलीप कांबळे

मावळ,पुणे: भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली. तंत्रज्ञानाच्या युगात सगळेजण वावरत असताना आजही देशाच्या अनेक घरांमध्ये वीज नाही. मावळ (Maval) तालुक्यात असणाऱ्या कुरवंडे गावातील धनगर वस्ती देखील भारत स्वतंत्र झाल्यापासून विजेच्या (Electricity) प्रतीक्षेत होते. अखेर १५ ऑगस्ट २०२२ ला त्यांची प्रतिक्षा संपली आहे. भारताचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच आज या धनगर वस्ती मध्ये लाईट आली. मागील अनेक वर्षांपासून विजेच्या प्रतिक्षेत असलेल्या कुरवंडे येथील धनगर वस्तीवर देशाच्या पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांमुळे वीज पोहचली आहे. त्यामुळे या धनगर वस्तीमधील लहान मुलांपासून ते सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. (Maval Latest News)

हे देखील पाहा -

मावळमधील हे कुरवंडे गाव. यातील धनगर वस्तीमधील सुमारे पाच पिढ्या या लाईट न बघताच गेल्या. आताच्या आधुनिक काळातदेखील येथील नागरिक अंधारातच राहत होते. विद्युत पुरवठयाअभावी तंत्रज्ञानाच्या युगात देखील या वस्तीवर वास्तव्यास असणारे नागरिक टेलिव्हिजन आणि इतर तांत्रिक साधनांपासून वंचित होते. या वाडीतील मुले बाहेर उजेड असेपर्यंत अभ्यास करायचे नाहीतर मग घरात असणारा दिवा लावून त्याभोवती बसून त्या मंद प्रकाशात बसून आपले शिक्षण करत होते. परंतु इतक्या मंद प्रकाशात अभ्यास करताना डोळ्यातून पाणी यायचे, एकदम खाली वाकल्याने पाठ आणि कंबर दुखायची त्यामुळे अभ्यास करण्यात मन लागायचे नाही अशी भावना येथील मुलांनी व्यक्त केली. तर इतक्या पिढ्या विनालाईट गेल्या, आता या नवीन पिढीला लाइट मिळणार त्यामुळे आनंद वाटत असल्याची भावना या धनगर वस्तीमधील जेष्ठांनी व्यक्त केली.

हा वीज पुरवठा जिल्हा नियोजन कमिटीकडून मंजूर करण्यात आला आहे. मात्र इथे वीज आणण्यासाठी खूप त्रास झाला. एक तर विजेचे पोल लावण्याकरीता खाजगी जागा कोणीही देत नव्हते. विद्युत पोल करीता खड्डे होत नव्हते काळा दगड होता. मात्र आमदारांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेत त्यांची समजूत काढली आणि अखेर कुरवंडी गावाला वीज देण्यात यश आले. या गावात धनगर समाज राहतो. एखाद्या गावातील वस्तीला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षी आपल्याकडून एक गाव प्रकाशमय होते हा आनंद गगनात मावेनासा आहे असं महावितरणचे अधिकारी विष्णू पवार म्हणाले.

येथील लोकवस्तीवर वीज पोहचविण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बारा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. या निधीतून धनगर वस्तीवर विद्युत पुरवठा करण्यासाठी अठ्ठावीस विजेचे खांब, विद्युत वाहक तारा आणि त्रेसष्ठ केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षानिमित्त आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत उद्घाटन करुन येथील धनगर वस्तीवर विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.

मागील अनेक वर्षे येथील नागरिक विजेची मागणी करून देखील त्यांची कोणी दखल घेत नव्हते. मात्र आता वीज आल्याने या वस्तीमध्ये राहणाऱ्या मुलांनी शिकून मोठं होण्याचा निर्धार केला आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे, हाच आदर्श राज्यातील इतर आमदारांनी घ्यावा हीच एक माफक इच्छा नक्कीच आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT