मुंबई: राज्यात लोडशेडींचं संकट, त्यात उन्हाळा असताना ठाण्या जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर याठिकाणी बत्ती गुल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पडघा येथील महापारेषणच्या 400 KV उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाला. त्यामुळे पडघा ते पाल 220 KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या (MSEDCL) डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित (Power Cut) झाला आहे. याबाबत महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भागाचा वीजपुरवठा तातडीने सुरू व्हावा यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Electricity gone in in Kalyan, Dombivli, Ambernath, Badlapur; Repair work begins on the battlefield)
हे देखील पाहा -
दरम्यान मुंबईतही अनेक ठिकाणी वीज पूरवठा खंडीत झाला होता. दादरमधील राज्यपालांच्या हस्ते होणाऱ्या राज्यपुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात बत्ती गुल झाल्याने गोंधळ निर्माण झाला. कार्यक्रम सुरू होण्याआधीच लाईट गेल्याने सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कळवा-पडगा ४०० kv लाईन १०.१५ च्या सुमारास ट्रिप झाली TATA PSCC नुसार पुरवठा 10 मिनिटांत वीजपूरवठा सुरळीत करण्यात आला. माहीम,बांद्रा, सांताक्रूझ, दादर भागात वीज पुरवठा खंडित झाला होता तसेच महापारेषण उच्चदाब वाहिनी मध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण पालघर विभागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
जवळपास तासाभरानंतर डोंबिवलीत 220kV पडघा-पाल वर पुरवठा पूर्ववत झाला. तसेच , दादर, माहीम, सायन भागात वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. उर्वरीत ठिकाणी काम युद्धपातळीवर सुरु आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भागाचा वीजपुरवठा तातडीने सुरू व्हावा यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.