Electric Shock Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : घरासमोर खेळणाऱ्या 3 मुलींना विजेचा धक्का, एका मुलीचा मृत्यू

Mumbai News : वाकोल्यातील डवरीनगर परिसरात ही दु्र्देवी घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन लहान मुलींना खेळता खेळता विजेचा शॉक लागला. या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला आहे, तर दोन मुलींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाकोल्यातील डवरीनगर परिसरात ही दु्र्देवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळची ही घटना आहे. तीन मुली आपल्या घराजवळ एकत्र खेळत होत्या. खेळता खेळता त्यांनी लोखंडी खांबाला स्पर्श केला, ज्या खांबामध्ये करंट उतरला होता. मुलींला शॉक लागल्याचं स्थानिकांना समजताच मुलींना तातडीने रिक्षामधून व्हीएन देसाई रुग्णालयात नेले. (Latest Marathi News)

तिथे एका मुलीला डॉक्टरांना मृत घोषित केलं. तर इतर दोन मुलींचा तब्येत बरी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. शहरीन परवीन इफ्तेकर शेख असं सात वर्षीय मुलीचं नाव आहे. तनिष्का शिंदे (वय ५ वर्ष), वैष्णवी माळवे (9 वर्ष) असं इतर दोन मुलींची नावं आहेत.

अँडरग्राउंड केबल लोखंडी खांबाला स्पर्श करत असल्याने वीज प्रवाह त्या खांबात उतरला होता. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी देखरेखीचं काम पाहणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT