Eknath Shinde, Uddhav Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Shinde vs Thackeray : खरी शिवसेना कुणाची? सुनावणी पुन्हा लांबणीवर; आयोगाने दिली नवी तारीख

Maharashtra Politics Crisis: राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena News : शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे खरी शिवसेना कुणाची? असा सवाल उपस्थित झाला आहे. आज निवडणूक आयोगासमोर याबाबतची सुनावणी झाली. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० तारखेला होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. (Latest Marathi News)

मागील ६ महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना कोणाची? यावर सत्तासंघर्ष दिसून येत आहे. शिवसेना पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचं काम सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे सोपावलं आहे. आज निवडणूक आयोगासमोर याबाबत महत्वाची सुनावणी पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  गटाच्या वकीलांनी खरी शिवसेना आमचीच असा दावा निवडणूक आयोगासमोर केला. (Maharashtra Political News)

आजच्या सुनावणीत काय घडलं?

आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या वतीने अँड महेश जेठमलानी तर ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. तसेच या कागदपत्रांची छाणणी करण्यासाठी ओळखपरेड करावी, अशी मागणीही सिब्बल यांनी केली.

दुसरीकडे कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तीवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी खोडून काढला आहे. शिंदे गटाच्या कागदपत्रात कोणत्याही त्रुटी नाहीत, असंही ते म्हणाले. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावाबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी होणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार हे आता शुक्रवारी कळणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांचा एकत्र विमानाने प्रवास

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

Pitru Paksha 2025: पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षात करा हे दान

SCROLL FOR NEXT