उल्हासनगर मध्ये वृद्ध महिलेस लुटले; ५४ हजार घेऊन चोर पसार! Saam Tv
मुंबई/पुणे

उल्हासनगर मध्ये वृद्ध महिलेस लुटले; ५४ हजार घेऊन चोर पसार!

दूध व्यवसायातील 54 हजार रुपये हिसकावून चोरट्याने काढला होता पळ; मात्र, पोलिसांनी एक तासात केले चोरट्यानी केले गजाआड, मुद्देमाल ही केला हस्तगत!

अजय दुधाणे

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर मध्ये दिवसा ढवळ्या एका वृद्ध महिलेला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, अवघ्या एका तासाच्या आत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास पुष्पा बजाज हि दुधाचा व्यवसाय करणारी वृद्ध महिला फॉरवर्ड लाईन चौकातून दुधविक्री करून घरी जात होती.

हे देखील पहा :

मात्र, याचवेळी तीन इसम या महिलेच्या मागावर होते. पुष्पा बजाज या इमालीपाडा येथील एका गल्लीतुन जात असताना त्यांच्या मागावर असलेल्याचोरट्यांनी बजाज यांच्या कडील दुध विक्रीतुन आलेले रोख ५४ हजार ६०० रुपये जबरीने चोरुन पळ काढला होता. मात्र उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी तपास करून आरोपी सागर रमाकांत चव्हाण (वय २१), बॉबी बाबूसिंग लभाना (वय २२) या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

त्यांनी त्यांचा साथीदार आनंद विद्वान कांबळे यांच्यासह सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. या आरोपींकडून चोरी करण्यात आलेली ५४ हजार ६०० रुपये इतकी रक्कम पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सदर आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

SCROLL FOR NEXT