Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: नदीवर फूले टाकण्यासाठी गेली अन् पडली; पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेला मिळालं जीवनदान

Ulhas River: कल्याणमधील उल्हास नदीत बुडणाऱ्या वृद्ध महिलेला पोलीस हवालदार मच्छिंद्र चव्हाण यांनी वाचवलं.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण प्रतिनिधी

कल्याणमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेला जीवनदान मिळालं आहे. कल्याण पश्चिमेकडील गांधारी पुलाखालून वाहणाऱ्या उल्हास नदीवर फूले टाकण्यासाठी एक वृद्ध महिला आली होती. मात्र काही वेळाने ही महिला त्या ठिकाणी दिसत नसल्याचे एका नागरिकांनी पाहिले, त्यांनी याबाबत गांधरी पुलावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला माहिती दिली. हे ऐकताच पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या ट्रॅफिक वार्डनसोबत नदीत उडी मारली.

नदीत त्यांना महिलेची साडी दिसली. साडीला खेचताच महिलेचा हात पोलीस कर्मचाऱ्याच्या हाती आला. महिलेला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मच्छिंद्र चव्हाण, असे या धाडसी व प्रसंगावधान राखणाऱ्या वाहतूक पोलीस हवालदाराचे नाव आहे. मच्छिंद्र चव्हाण यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या वृद्ध महिलेला जीवनदान मिळाले.

मिळालाय माहितीनुसार, कल्याण जवळील गांधारी येथील एका सोसायटीमध्ये सुनंदा बोरसे या 72 वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह राहतात. सुनंदा बोरसे या महिला फुले टाकण्यासाठी नदीजवळ आल्या होत्या. आज दिवसभरात कोसळणाऱ्या पावसामुळे नदीची पाण्याची पातळी वाढली होती. सुनंदा या खाली उतरल्या. एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने नदी किनारी गेलेली महिला दिसत नसल्याची माहीती जवळच गांधारी पुलावर वाहतूक नियंत्रणासाठी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस हवालदार मच्छिंद्र चव्हाण यांना दिली.

मच्छिंद्र चव्हान यांनी वार्डन संजय जयस्वाल यांच्यासह थेट नदी किनारा गाठला. पावसामुळे नदीच्या पाण्याचे पातळी वाढली होती. काही अंतरावर त्यांना महिलेची साडी तरंगताना दिसली. संशय आल्याने मच्छिंद्र व त्यांचा वॉर्डन जयस्वाल दोघे पाण्यात उतरले. त्यांनी साडी पकडली असता वृद्ध महिलेचा हात त्यांच्या हाताला लागली.

गाळात ही महिला रुतली होती. या दोघांनी वृद्ध महिलेला पाण्याबाहेर काढत तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुनंदा बोरसे, असे या महिलेचे वृद्ब महिलेचे नाव आहे. वाहतूक पोलीस हवालदार मच्छिंद्र चव्हाण व ट्राफिक वॉर्डन संजय जयस्वाल या दोघांच्या प्रसंगावधानामुळे या 72 वर्षीय वृद्ध महिलेला पुन्हा जीवनदान मिळाले. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangram Jagtap: राष्ट्रवादीत 'संग्राम', अजित पवारांना 'ताप' जगतापांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच

De De Pyaar De 2 Trailer: अजय देवगण-रकुलच्या प्रेमात आर माधवन ठरणार अडसर; ट्रेलर पाहून हसून हसून पोट दुखेल

Credit Card: क्रेडिट कार्डचं कर्ज वाढत चाललंय? घाबरु नका! वापरा स्मार्ट अन् सोप्या टिप्स, बिल होईल कमी

Weather Update : दिवाळीत धो-धो कोसळणार? परतीचा पाऊस त्रास देणार; वाचा Report

Thackeray Brothers: मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचं पारडं जड, 70 जागांवर मनसेची मतं निर्णायक?

SCROLL FOR NEXT