Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv Sena Hearing Supreme Court Live Saam Tv
मुंबई/पुणे

Shinde vs Thackeray : बंडामुळे नाही तर 'या' कारणाने सरकार पडलं; शिंदे गटाच्या वकिलांचा कोर्टात दावा

महाविकास आघाडी सरकार हे बंडामुळे नाही तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे पडलं, असा दावा हरिश साळवे यांनी केला आहे.

Shivaji Kale

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv Sena Hearing Supreme Court Live : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षांचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असून ५ सदस्यीय घटनापीठासमोर त्यावर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी (14 फेब्रुवारी) ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. आज शिंदे गटाचा युक्तीवाद सुरू असून हरीश साळवे बाजू मांडत आहेत. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद शिंदे गटाकडून खोडून काढण्यात येत आहे. यादरम्यान शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी सुप्रीम कोर्टासमोर एक मोठा मुद्दा मांडला आहे. महाविकास आघाडी सरकार हे बंडामुळे नाही तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे पडलं, असा दावा हरिश साळवे यांनी केला आहे. (Maharashtra Political News)

उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला. त्यांना राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलं होतं. २८ जून रोजी ही बहुतच चाचणी होणार होती. मात्र, त्यांनी त्यापूर्वी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते, तर काही मुद्दे उपस्थित करता आले असते. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच राजीनामा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या राजीनामा अवैध ठरवला, तरच या चर्चांना अर्थ उरेल, असेही हरीश साळवे म्हणाले.

ठाकरे गटाने युक्तीवादात काय म्हटलं?

मंगळवारी ठाकरे गटाच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वासाची नोटीस आणि प्रत्यक्ष सभागृहात मांडलेला प्रस्ताव या दोन्हीमध्ये फरक असतो. नबाम रेबिया प्रकरणातील निकालानुसार नोटीस बजावल्यानंतर विधानसभा अध्यक्षाला अधिकार राह नाही आणि फक्त नोटीस देऊन राजकीय हित साध्य केलं जाऊ शकतं, सरकार पाडलं जाऊ शकतं, असं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं.

नोटिशीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केलं गेलं. विधानसभा उपाध्यक्षांच्या अपात्रतेच्या नोटिशीला न्यायालयाने स्थगिती दिली आणि राज्यातील सरकार कोसळलं, असंही सिब्बल यांनी म्हटलेलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : धक्कादायक प्रकार; अकोला शासकीय रुग्णालय आवारातील लॉनवर अश्लील चाळे

दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलं, १० तोळं सोन्यासाठी किती मोजावे लागणार? पाहा लेटेस्ट दर

Shocking: इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून २ मित्रांनी उडी मारली, सामूहिक आत्महत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, दुपारी फडणवीस करणार मोठी घोषणा?

Ahaan Panday : 'सैयारा'नंतर अहान पांडेला मोठ्या चित्रपटाची लॉटरी, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स?

SCROLL FOR NEXT