शिवाजी काळे, साम टीव्ही
Shivsena Political Crisis : शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच, अंधेरी पूर्व जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्याच दरम्यान शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाचं या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगाने ७ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
त्यामुळं ७ ऑक्टोबरला निवडणूक आयोग काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे निवडणूक जाहीर झाल्यानंतर (Maharashtra News) शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत काय निर्णय घेते? हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोग (Election Commission) चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकते का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
काय आहे प्रकरण?
अंधरी पूर्व चे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं ११ मे २०२२ ला निधन झालं होतं. त्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून 3 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर १४ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी श्रतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली असून पटेल हे २०१९ ला अपक्ष निवडणूक लढली होती.
ठाकरेंना धनुष्यबाण मिळून नये म्हणून शिंदे गटाची नवी चाल?
अंधेरी पूर्वच्या (Andheri) पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का देण्यासाठी शिंदे गटाने नवी रणनिती आखली आहे. ठाकरे गटाला धनुष्यबाण (Shivsena) चिन्ह मिळू नये म्हणून आता शिंदे गटाकडून सुद्धा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टिव्हीला दिली आहे.
एकाच चिन्हावर दोन उमेदवार दिल्याने पेच निर्माण होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल, अशी शिंदे गटाची रणनीती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाची काल वर्षा निवास्थानी बैठक झाली. या बैठकीत ही रणनिती झाली असल्याची माहिती आहे.
शिंदे गटाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला असला, तरी न्यायालयीन लढाईत जिंकण्यासाठी शिंदे गट देखील आपला उमेदवार पुढे करू शकतो. कारण, एका चिन्हावर दोन उमेदवार दिल्याने पेच निर्माण होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल, अशी शिंदे गटाची रणनीती असल्याचं सांगण्यात येत आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.