Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena : BMC निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला धक्का? त्या कामांची 'कॅग'कडून चौकशी होणार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि ठाकरे गटातील (Uddhav Thackeray) संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक, साम टीव्ही

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि ठाकरे गटातील (Uddhav Thackeray) संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण, कोरोनाकाळात मुंबई पालिकेच्या कामाची आता 'कॅग'कडून चौकशी होणार आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या कामात १२ हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असा संशय शिंदे सरकारला आला आहे. या कामाची चौकशी करण्याची विनंती शिंदे सरकारकडून 'कॅग'ला करण्यात आली आहे.

दरम्यान, शिंदे सरकारने (Eknath Shinde) केलेली विनंती कॅगने देखील मान्य केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोडांवर मुंबई महापालिकेतील सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना केंद्रे उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी आदी कामांचा समावेश आहे.

कोरोना संकटकाळात मुंबई महापालिकेने शहरात उभारलेल्या कोरोना करोनाकाळात मुंबई पालिकेने शहरात उभारलेल्या करोना केंद्रांत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता.

या आरोपांबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहांत केली होती. गैरव्यवहार झालेली काही प्रकरणे फारच गंभीर असल्याने त्यांचे महालेखापरीक्षक व नियंत्रकाकडून (कॅग) विशेष लेखापरीक्षण करण्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले केले होते.

महापालिकेतील कोरोना केंद्रे उभारण्यातील गैरव्यवहार, कोरोनाच्या नावाखाली वारेमाप खरेदी, अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांना कंत्राट देणे, दहीसर येथील जमीन खरेदी प्रकरण, रस्ते बांधणी अशा सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कामांचे ‘कॅग’च्या माध्यमातून लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT